शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा वेढा पडणाऱ्या गावांसाठी यंत्रणा तयार ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:17 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात चांगला पाऊस होत असून अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता असलेल्या गावांना मदत ...

कोल्हापूर : जिल्ह्यात चांगला पाऊस होत असून अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता असलेल्या गावांना मदत पोहोचवण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पूरपरिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या वेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, पावसाळ्यात रस्ते व पूल पाण्याखाली जाऊन वाहतुकीला अडथळा होतो, त्या परिस्थितीतही काही नागरिक पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात व अपघाताची शक्यता असते त्यामुळे पुराचे पाणी आलेले रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करा. वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी. जिल्ह्यातील पाझर तलाव सुस्थितीत असल्याची खात्री करा. महावितरण विभागाने आवश्यक साहित्याची देखभाल, दुरुस्ती करून घ्यावी. गरजेनुसार मनुष्यबळ व अधिकचे साहित्य तयार ठेवावे. अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्वरित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री व मनुष्यबळ तयार ठेवा.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, पूरबाधित गावात महसूल, पोलीस, आरोग्य व अन्य संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना लगेच मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी केलेल्या तयारीची माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती दिली.

---

आपदा मित्र, सखीचे कौतुक

जिल्हाधिकाऱ्यांनी पूर व आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी प्रशासनासोबत कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांतील स्वयंसेवकांच्या कामाचे कौतुक करत कठीणप्रसंगी मदतकार्य करणाऱ्या स्वयंसेवकांचे काम प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांच्या हस्ते आपदा सखी शुभांगी घराळ हिचा सत्कार करण्यात आला.

--

एकही जनावर वाहून जाता कामा नये

बाधित होणाऱ्या गावांतील नागरिकांना आधीच सूचना द्या. त्यांच्यासाठी पुरेसे अन्नधान्य व औषधसाठा उपलब्ध ठेवा. एकही जनावर वाहून जाऊ नये असे काटेकोर नियोजन करा. छावणीतील जनावरांसाठी पुरेसे पशुखाद्य, ओला व सुका चारा, औषधसाठा तयार ठेवा असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

---

भूस्खलन होणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करून घ्या

-भूस्खलनामुळे नागरिकांना इजा होऊ नये, यासाठी उपाययोजना करा.

-पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी प्रशिक्षित बचाव पथके तयार ठेवा.

---

फाेटो नं २००७२०२१-कोल-पूर आढावा

ओळ : कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेतील आपदा मित्र व आपदा सखींची भेट घेऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले.

---