शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा प्रदूषणप्रश्नी म्हणणे मांडा

By admin | Updated: July 19, 2014 00:32 IST

उच्च न्यायालयाचे आदेश : महापालिकेसह इचलकरंजी नगरपालिकेला सूचना

कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणाबाबत ‘निरी’ने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या दोषपूर्ण अहवालावर कोल्हापूर महापालिका व इचलकरंजी नगरपरिषदेला म्हणणे मांडण्याचे आदेश आज, शुक्रवारी न्यायालयाने दिले. सुनावणी पुढील शुक्रवारपर्यंत तहकूब ठेवण्यात आली आहे. ‘निरी’च्या प्रतिनिधींनी आज शिफारशीच्या अनुषंगाने कोल्हापूर महापालिका व इचलकरंजी नगरपरिषदेने केलेल्या उपाययोजनेसंदर्भात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावर आपले लेखी म्हणणे दाखल केले. इचलकरंजी येथील दत्ता माने, सदा मलाबादे यांनी वकील धैर्यशील सुतार यांच्यामार्फत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाच्या न्या. अभय ओक व न्या. ए. एस. चांदूरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. कोल्हापूर महापालिकेने केलेल्या दाव्याप्रमाणे ६५ टक्के शहराला सांडपाणी व्यवस्थापन असल्याचे सांगितले.(पान १ वरून) पण याची शहानिशा करणे गरजेचे असल्याचे ‘निरी’ समितीने सांगितले. रंकाळा तलावातील सांडपाणी महापालिकेने दुधाळी नाल्याकडे वळवले आहे, हे अयोग्य असल्याचे ‘निरी’ने म्हटले आहे. दुधाळी व जयंती नाल्यातील पंपिंग स्टेशनची क्षमता पाहता यावर अतिरिक्त ताण पडणार आहे. दुधाळी नाल्यावरील १७ दशलक्ष लिटरचा सांडपाणी प्रक्रिया केंद्र आॅगस्टपर्यंत पूर्ण केला पाहिजे. तो पूर्ण होत नाही तोपर्यंत जैविक तंत्राचा वापर करून प्रदूषणावर नियंत्रण ठेवावे. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी आय.आय.टी.ने विकसीत केलेले सेप्टिक टँकचा वापर करावा, असे ‘निरी’ने म्हटले आहे. यावर, खंडपीठाने महापालिका व इचलकरंजी नगरपरिषदेच्या वकिलांना आपले म्हणणे पुढील शुक्रवारी मांडण्याचे आदेश दिले. त्यानंतर याचिका दाखल करून घेऊन सर्व समावेशक असे आदेश दिले जातील, असे स्पष्ट केले.