शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

हातकणंगले तालुका , निवडणुकीपूर्वी राजकीय हवा तापली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:50 IST

हातकणंगले : नेते तितके पक्ष आणि आघाड्या याप्रमाणे तालुक्याचे राजकारण प्रत्येक नेत्याभोवती फिरत असून, निवडणुका अद्याप वर्ष-दीड वर्षावर असल्या तरी आतापासूनच राजकीय हवा तापायला सुरुवात झाली

ठळक मुद्देशिवसेनेत गटबाजी, कॉग्रेसमध्ये दुफळी, भाजप ‘जनसुराज्य’च्या विलीनीकरणाच्या हालचाली

दत्ता बिडकर।हातकणंगले : नेते तितके पक्ष आणि आघाड्या याप्रमाणे तालुक्याचे राजकारण प्रत्येक नेत्याभोवती फिरत असून, निवडणुका अद्याप वर्ष-दीड वर्षावर असल्या तरी आतापासूनच राजकीय हवा तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या हातकणंगले भेटीने शिवसैनिक रिचार्ज झाले तरी गटबाजी मात्र कायम आहे.

काँग्रेस (आय)चे प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या कोल्हापूर दौºयामध्ये तालुका काँग्रेसमधील दुफळी उफाळून आली, तर भाजप आणि ‘जनसुराज्य’च्या विलीनीकरणाच्या हालचाली मुख्यमंत्र्यांच्या वारणा भेटीने गडद झाल्या. ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची राजकीय जवळीक भाजपसह इतरांची डोकेदुखी वाढविणारी आहे. मात्र, माजी आमदार महादेवराव महाडिक यांची राजकीय गुगली आणि माजी खासदार निवेदिता माने यांची राष्ट्रवादीतील सक्रियता आगामी निवडणुकांच्या दृष्टीने उदंड झाले पक्ष आणि मोकाट सुटतील नेते, अशीच राहणार आहे.

आगामी वर्षभरामध्ये कोणत्याही निवडणुका नाहीत; मात्र आतापासूनच तालुक्यामध्ये राजकीय हवा तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा हातकणंगले येथील धावता दौरा शिवसैनिकांना रिचार्ज करणारा ठरला असला तरी आमदार आणि जिल्हाप्रमुख अशी गटबाजी लपून राहिली नाही. भाजपनेही तालुक्यामध्ये ‘जनसुराज्य’ला बरोबर घेतले आहे. आमदार सुरेश हाळवणकर यांनी माजी आमदार राजीव आवळे यांना पाठबळ देण्यासाठी भाजपची सर्व ताकद त्यांच्या मागे उभा करण्याचा प्रयत्न चालविला आहे. कोल्हापूर दौºयावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वारणा दौºयामुळे भाजप आणि जनसुराज्य विलीनीकरणाची चर्चा जोरात आहे.

काँग्रेस (आय)चे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या कोल्हापूर दौºयामध्ये माजी खा. जयवंत आवळे यांनी उघडपणे केलेल्या तक्रारीने तालुक्यामधील गटबाजी स्पष्ट झाली आहे. आवाडे आणि आवळे यांचे इचलकरंजी आणि हातकणंगले विधानसभेचे राजकारण काँग्रेसला दोन्ही मतदारसंघांतून संपविण्यास कारणीभूत ठरले आहे. आवाडे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नवीन कोल्हापूर जिल्हा ताराराणी विकास आघाडी तयार करून निवडणुका लढविल्या आणि यामुळे काँग्रेस पक्षाची वाताहत झालीराजू शेट्टी, प्रकाश आवाडे जवळीक : भाजप-जनसुराज्यला त्रासदायकतालुक्याच्या बदलत्या राजकीय संदर्भानुसार स्वाभिमानी पक्षाचे खा. राजू शेट्टी यांनी भाजपची साथ सोडली. याचा फायदा माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी उचलून खा. राजू शेट्टी यांच्याबरोबर आवाडे यांनी जवळीक वाढवत भाजपबरोबर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढविली आहे. तालुक्याच्या आगामी राजकीय निवडणुकीमध्ये आवाडे आणि शेट्टींची गट्टी जमण्याची शक्यता असून, तसे झाल्यास काँग्रेस, शिवसेना आणि भाजप-जनसुराज्यला ही धोक्याची घंटा आहे२ तालुक्याच्या राजकारणामध्ये वेगळा असलेला माजी आ. महादेवराव महाडिक यांचा गट ऐनवेळी कोणती राजकीय गुगली टाकणार हे स्पष्ट नसले तरी महाडिक यांना धड भाजप जमेला धरत नाही आणि धड काँग्रेसही जमेला धरत नसल्यामुळे महाडिक कोणाचे हे समजत नाही. कारण महाडिक नेहमी जिंकणाºया घोड्यावर स्वार होऊन राजकारण करीत आले असल्यामुळे महाडिक यांचे राजकारण फिरत्या ढालीप्रमाणे झाले आहे३ माजी खा. निवेदिता माने यांनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चापासून आपली सक्रियता वाढविली आहे. निवेदिता माने आणि सत्त्वशील माने यांची तालुका मोर्चाला असलेली उपस्थिती राष्ट्रवादीला बळ देणारी आहे. मात्र, धैर्यशील माने यांची खासदार संभाजीराजे यांच्याबरोबर असलेली सलगी आणि आ. सुरेश हाळवणकर आणि भाजप जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांच्याबरोबर असलेली सलगी पाहता माजी खासदारांच्या घरात दोन गट असल्याची चर्चा आहे.