शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

नृसिंहवाडीत अतिक्रमणावर हातोडा

By admin | Updated: March 13, 2015 23:58 IST

राशिचक्रकार शरद उपाध्ये यांचे अतिक्रमण जमीनदोस्त केल्याने नृसिंहवाडी गावातील इतर अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.

नृसिंहवाडी : गेली अनेक वर्षे वादाच्या चक्रात अडकलेले राशिचक्रकार शरद उपाध्ये यांच्या लक्ष्मी नृसिंह ट्रस्ट (मुंबई) संचलित वेदभवन या त्यांच्या वास्तूशेजारी झालेल्या अतिक्रमणावर शुक्रवारी ग्रामपंचायतीने हातोडा टाकला.नोटीस पाठवूनही अतिक्रमण न हटविल्यामुळे ग्रामपंचायतीच्या पथकाने जेसीबीच्या सहायाने हे अतिक्रमण जमीनदोस्त केले. तसेच अतिक्रमणित शेडमधील साहित्य जप्त केले.शुक्रवारी सकाळी ९ वाजता ग्रामविकास अधिकारी नंदकुमार निर्मळे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण शेड काढण्याचा निर्धार केला. त्यानुसार ग्रामस्थांच्या उपस्थितीत कारवाईला प्रारंभ झाला. सुरुवातीला पंचांनी पंचनामा केला. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार अतिक्रमण सिद्ध झाल्याने राजश्री कांबळे व ग्रामविकास अधिकारी नंदकुमार निर्मळे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लेखी आदेश देऊन अतिक्रमणविरोधी पथक नियुक्त केले.अतिक्रमणप्रश्नी शरद उपाध्ये यांच्या ट्रस्टने ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर बदनामीचे गुन्हे दाखल करून न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनला होता. शेवटी न्यायालयीन निकाल व जिल्हा परिषदेचा आदेश यांची अंमलबजावणी करून शरद उपाध्ये यांनी बांधलेल्या वेदभवनजवळील मिळकत नं. ९६१ जवळ असलेल्या सार्वजनिक खुल्या जागेवर बांधण्यात आलेली पत्राशेड इमारत जमीनदोस्त केली. ग्रामपंचायतीने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम कलम ५३/२ नुसार ही कारवाई केल्याचे सरपंच राजश्री कांबळे व उपसरपंच अभिजित जगदाळे, सदस्य अनंत धनवडे यांनी सांगितले. या कारवाईवेळी सदस्य सर्वश्री अशोक पुजारी, परशुराव गवंडी, राजेंद्र आणुजे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)राशिचक्रकार शरद उपाध्ये यांचे अतिक्रमण जमीनदोस्त केल्याने नृसिंहवाडी गावातील इतर अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.