शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगले, बुलडाणा ‘स्वाभिमानी’च्या वाट्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:32 IST

विश्वास पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लोकसभेच्या हातकणंगले व बुलडाणा या जागा देण्याबाबत शिक्कामोर्तब ...

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लोकसभेच्या हातकणंगले व बुलडाणा या जागा देण्याबाबत शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तशी घोषणा रविवारी नांदेड येथे केली; परंतु बुलडाण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने त्या पक्षाने संमती देण्याची गरज आहे. येत्या दोन-तीन दिवसांत दोन्ही काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एकत्रित बैठक होत आहे. त्यामध्येच त्याचा अंतिम निर्णय होईल.संघटनेने तीन जागा मागितल्या आहेत, त्यातील दोन मिळत असतील तर संघटनेलाही ते हवेच आहे. दुसऱ्या बाजूला खासदार राजू शेट्टी यांच्यासारखा मोदी सरकारविरोधात आक्रमक बोलणारा नेता आघाडीत हवा ही देखील दोन्ही काँग्रेसचीही अगतिकता आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडी काही करून शेट्टी यांना आघाडीतून बाहेर जाऊ देणार नाही. बुलडाण्यातून संघटनेचे रविकांत तूपकर हे उमेदवार असतील. त्यांनी जिल्ह्यात चांगला जम बसविला आहे. संघटनेला लोकसभेच्या दोन जागांवर विजय व ६ टक्के मते मिळाल्यास प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळते. संघटनेतील दोन नंबरचे नेतृत्व म्हणून तूपकर यांना बळ देणे याचा शेट्टी यांच्यावरही दबाव आहे.त्यामुळे बुलडाण्याची जागा मिळाल्यास संघटनेला आघाडीसोबत जाण्यात अडचण नाही. या मतदारसंघांतून राष्ट्रवादीकडून माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव चर्चेत आहे.त्यांच्यासाठी स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार हेच आग्रही आहेत; परंतु त्यांना जर स्वाभिमानी संघटना आघाडीत हवी असेल तर ही जागा सोडावीच लागेल, असे चित्र आहे. तो अंदाज घेऊनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी तशी घोषणा केली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.इंद्रजित देशमुख अजून द्विधा मन:स्थितीत...च्संघटनेने सांगली लोकसभेची जागा आपल्याला द्यावी व तेथून निवृत्त सरकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांना लढण्याची आॅफर दिली आहे; परंतु ते अजून द्विधा मनस्थितीत आहेत.मी आयुष्यभर रचनात्मक काम करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे राजकारणात जाऊन मला एकमेकांची उणीदुणी काढणे जमणार नाही, असे त्यांना वाटते. तुमच्यासारखी चांगली माणसे राजकारणात यायला हवीत. उणीदुणी काढायचीच नाहीत.आपण आपले चांगले काम घेऊन पुढे जायचे, असा आग्रह खासदार शेट्टी यांनी त्यांच्याकडे धरला आहे. ही जागा काँग्रेसकडूनही स्वाभिमानीला मिळणार का, याची अजून खात्री नसल्याने देशमुख यांना आग्रह करण्यातही अडचणी येत आहेत.