शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

‘हातकणंगले’ला तब्बल वीस वर्षांपासून ठेंगाच!

By admin | Updated: January 9, 2015 00:01 IST

सभासद संख्याही नगण्यच : संघाचे नेतृत्व करणारे महादेवराव महाडिक याच तालुक्यातील

आयुब मुल्ला -खोची -गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे; परंतु हातकणंगले तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये म्हणावा तितका उत्साह दिसत नाही. गेली सतरा ते वीस वर्षे हा तालुका संचालकपदापासून वंचित आहे. हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतून एक संचालक हा अलिखित नियमच करून शिरोळलाच स्थान देण्याचा प्रयत्न सत्ताधारी गटाने केला आहे. विशेष म्हणजे या संघाचे नेतृत्व करणारे आमदार महादेवराव महाडिक हे या तालुक्यातील आहेत. ही सर्वांत जमेची बाब आहे. तरीही सभासद संख्याही दोन आकड्यांवर नाही. त्यामध्ये संथगतीने वाढ होऊन ती ७६वर पोहोचली आहे. त्यामुळे तुलनात्मकदृष्ट्या हा तालुका संचालकपदाच्या विचारात येत नाही की काय, अशी स्थिती आहे.हातकणंगले तालुक्यात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते; परंतु वारणा दूध संघाला बहुतांश दुधाचा पुरवठा होतो. त्यापाठोपाठ गोकुळ व इतर खासगी दूध संस्थांना होतो. ‘गोकुळ’ला दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये अलीकडच्या तीन वर्षांत वाढ झाली आहे. सुमारे १२५ संस्था दूध पुरवठा करतात. म्हणजे प्रतिदिन ३५ हजार लिटर दूध तालुक्यातून गोकुळ संघ संकलित करतो. विशेष म्हणजे सभासद असणाऱ्या संस्था मात्र ७६ इतक्या आहेत. वीस वर्षांत अत्यंत संथगतीने सभासद संख्येत फक्त दुप्पटीच्या पुढे वाढ झाली आहे.संघावर संचालक म्हणून काम करणारे कोणी असते तर त्यामध्ये निश्चितपणे वाढ झाली असती; पण तसे घडलेले नाही. या संघावर कै. जी. आर. पाटील, आप्पासाहेब खोत, वसंतराव मोहिते, अरुणराव इंगवले यांना संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मात्र हा तालुका संचालकपदापासून उपेक्षितच राहिला आहे.यावेळी हातकणंगले तालुक्यातून आमदार अमल महाडिक यांना संधी दिली जाईल, अशी विधानसभा निवडणुकीपूर्वी चर्चा होती; परंतु आता ते आमदार झाल्याने पुन्हा तालुका संचालकपदापासून दूर राहतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन निवडणुकांपासून आमदार महादेवराव महाडिक यांचे समर्थक विश्वास इंगवले हे संचालकपदासाठी इच्छुक आहेत. परंतु, त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. आमदार महादेवराव महाडिक यांच्या रूपाने दूध संघाचे नेतृत्व हातकणंगले तालुक्याकडे आहे, अशीही समजूत येथील वास्तव सांगते. महाडिक यांना संघावर वर्चस्व ठेवण्यासाठी इतर तालुक्यांना स्थान देण्यासाठी झुकते माप द्यावे लागते; परंतु आता तरी त्यांनी हातकणंगले तालुक्यातील कार्यकर्त्यांना संधी द्यावी, जेणेकरून अनेक दिवसांचा अनुशेष भरून निघेल. मात्र, प्रत्यक्षात काय होणार हे सर्व थोड्याच दिवसांत समजेल. या तालुक्यातील सर्व संस्थांवर महाडिक यांचेच वर्चस्व आहे. ‘गोकुळ’चाआखाडा