शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगलेत लक्षवेधी तिरंगी लढत

By admin | Updated: February 15, 2017 23:48 IST

तदारसंघातील राजकारण आणि राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत.

दत्ता बिडकर --हातकणंगले तालुक्याच्या नावाने ओळखला जाणारा आणि तालुक्याचे नाक असलेल्या या मतदारसंघात काँग्रेस, भाजप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत असली तरी राजकारणात कसलेले भाजपचे अरुण इंगवले विरुद्ध नवखे काँग्रेस पक्षाचे संदीप कारडे अशी काटा जोड लक्षवेधी लढत या मतदारसंघात होत आहे. हातकणंगले जिल्हा परिषद मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. २00२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्मिता अरुण इंगवले विजयी झाल्या होत्या. २00७ हा मतदारसंघ राखीव झाल्याने या निवडणुकीत इंगवले कुटुंबातील कोणीही उमेदवार नसल्याने यावेळी काँग्रेसने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचला होता. यावेळी काँग्रेसच्या अर्चना अरुण जाणवेकर विजयी झाल्या होत्या. २0१२ ला मतदारसंघ पुन्हा खुला झाला. यावेळी राष्ट्रवादीचे अरुण इंगवले विरुद्ध जनसुराज्य पक्षाचे अजित पाटील यांच्यात लढत होऊन इंगवले विजयी झाले होते.हातकणंगले जिल्हा परिषद मतदारसंघ यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यापासून इच्छुकांनी तयारी सुरू केली होती. मात्र, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांनी आपला कुणबी जातीचा दाखला काढल्यापासून या मतदारसंघातील राजकारण आणि राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. यामध्ये भर पडली ती अरुण इंगवले यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याची. अरुण इंगवले यांनी भाजपमध्ये जाऊन या मतदारसंघात कमालीची चुरस निर्माण केली आहे. अरुण इंगवले यांच्याबाबतीत पक्ष कोणताही असो त्याचा गटाच महत्त्वाचा ठरतो. गेल्यावेळी विरोधात असलेला जनसुराज्य यावेळी भाजप आघाडीमध्ये असल्याने तसेच हातकणंगले आणि सावर्डे पंचायत समिती जनसुराज्यला दिल्याने या निवडणुकीत अरुण इंगवले यांची जमेची बाजू ठरत आहे. भाजप-जनसुराज्य आघाडीने हातकणंगले पं. स.मध्ये जनसुराज्यचे विजय निंबाळकर यांना, तर सावर्डे पं.स.मधून अशोक नंरदेकर यांना संधी दिली आहे.हातकणंगले जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस पक्षाने संदीप कारंडे यांना उमेदवारी दिली आहे. हातकणंगले पंचायत समिती स्वाभिमानीला देऊन काँग्रेसने सावर्डे पंचायत समिती आपल्याकडे ठेवून मतदारसंघातील गणिते बदलून टाकली आहेत. हातकणंगले पंचायत समितीमध्ये स्वाभिमानीने प्रवीण जनगोडा यांना संधी दिली आहे. तर सावर्डे पंचायत समितीमध्ये काँग्रेसने नंरदेचे माजी सरपंच राजकुमार भोसले यांना संधी दिली आहे.मतदारसंघात शिवसेनेने मतदारसंघाबाहेरील माणगाववाडीचा उमेदवार दिल्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. हातकणंगले पंचायत समितीसाठी चंद्रकांत जाधव, तर सावर्डे पंचायत समितीसाठी सुनील चव्हाण यांना संधी दिली आहे. हातकणंगले जिल्हा परिषद मतदारसंघात चेहरा तोच, मात्र पक्ष वेगळा आणि राजकारणात कसलेला पैलवान अरुण इंगवले विरूद्ध नवी कोरी पाटी असलेले काँग्रेसचे संदीप कारंडे अशी काटा जोड लक्षवेधी लढत होत आहे.