शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

हसन मुश्रीफ म्हणाले, माता-भगिनी बनून माझा सांभाळ करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:12 IST

सेनापती कापशी : वडिलांचे निधन झाले त्यावेळी मी १९ वर्षांचा होतो. आता नऊ दिवसांपूर्वी आईंचे निधन झाले. ४६ वर्षांनंतर ...

सेनापती कापशी : वडिलांचे निधन झाले त्यावेळी मी १९ वर्षांचा होतो. आता नऊ दिवसांपूर्वी आईंचे निधन झाले. ४६ वर्षांनंतर आमच्या घरात दु:खद घटना घडली. हजारो लोकांनी भेटून आमचे सांत्वन केले. त्या सर्वांचा मी आभारी आहे. आईच्या निधनानंतर मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता तुम्हीच माता-भगिनी बनून माझा सांभाळ करा, असे भावनिक आवाहन करत आमदार हसन मुश्रीफ यांनी अश्रुंना वाट मोकळी केली.ते सेनापती कापशी (ता.कागल) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला व युवती मेळाव्यात बोलत होते.मुश्रीफ म्हणाले, या मतदारसंघातील जनतेने राजकीय पार्श्वभूमी नसताना मला आमदार, मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. या संधीचा उपयोग शासनाच्या योजना तळागाळात पोहोचवण्यासाठी केला. आता उर्वरित कामे व स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्या. खोटी आश्वासने देणाऱ्या भाजप सरकारला चारीमुंड्या चित केल्याशिवाय आता थांबायचं नाहीे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेश अध्यक्ष सक्षना सलगर म्हणाल्या, भाजप सरकारने पाच वर्षांत फक्त आश्वासनच दिले. एकही ठोस काम झालेले नाही. आता तर डान्सबारला या सरकारने परवानगी दिली म्हणजे ‘गायीला वाचवा आणि बाईला नाचवा’ असे या सरकारचे धोरण आहे. या फसव्या भाजप सरकारला चलेजाव म्हणण्याची वेळ आली आहे.येणारी निवडणूक संक्रमणाची आहे. देशाचा कायापालट करणारी निवडणूक असून, स्वाभिमानी रहा व भाजप सरकारला हद्दपार केल्याशिवाय आता स्वस्त बसायचं नाही, असे आवाहनही सलगर यांनी केले.या मेळाव्याला सेनापती कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी सभापती स्नेहल करंडे, आलाबादच्या सरपंच वंदना दिनेश मुसळे, गीतांजली पाटील, सरपंच सावित्री खतकल्ले, सरपंच शीतल फराकटे, मनिषा पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले.नंद्याळ येथील नारायण आडेकर यांच्या नेतृत्वाखाली समरजित घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाबूराव आस्वले, आण्णासाहेब आडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुश्रीफ गटात प्रवेश केला.यावेळी जि. प. सदस्य शिल्पा शशिकांत खोत यांनी स्वागत केले.तालुका संघाचे संचालक शशिकांत खोत यांनी प्रास्ताविक तर सभापती राजश्री माने यांनी आभार मानले. भैया माने, युवराज पाटील, नाविद मुश्रीफ, जे. डी. मुसळे, परशराम शिंदे, अंकुश पाटील, सागर पाटील, राजू राजीगरे, मधुकर नाईक, पी. के. पाटील, आदींसह कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.