शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
2
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
3
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
4
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
5
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
6
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
7
डेट फंड म्हणजे काय? जिओ ब्लॅकरॉकने याच फंडमधून सुरुवात का केली? असा होतो गुंतवणूकदारांना फायदा!
8
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
9
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...
10
MS Dhoni: धोनीचा 'Captain Cool' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
11
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
12
Shefali Jariwala Death: "त्यादिवशी तिने इंजेक्शन घेतलं होतं...", शेफाली जरीवालाच्या जवळच्या मैत्रिणीकडून मोठा खुलासा
13
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
14
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
15
रात्री लवकर जेवल्याने खरंच कमी होतं का वजन? 'हे' आहे सत्य, लठ्ठपणाला 'असं' करा बाय बाय
16
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
17
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
18
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
19
"१७ एप्रिलला आणखी एका महिलेचा कॉल आला अन्.."; क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप
20
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा

हणमंतवाडीत महिला सदस्यास मारहाण

By admin | Updated: November 1, 2015 00:59 IST

ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद : चौघांवर गुन्हा; एकास अटक

कोल्हापूर : हणमंतवाडी (ता. करवीर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून काँग्रेसचे माजी आमदार पी. एन. पाटील व शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके या दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी दोन्ही गटांच्या वतीने परस्पर विरोधी फिर्यादी करवीर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या. दरम्यान, महिला सदस्यास शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी संशयित आरोपी रामदास बाबूराव पिंजरे (वय ३०) याला करवीर पोलिसांनी अटक केली. हणमंतवाडी ग्रामपंचायतीमध्ये आमदार नरके गटाचे कार्यकर्ते रामदास पिंजरे यांची सत्ता आहे. ग्रामपंचायत पेयजल योजनेमध्ये घोटाळा झाल्याने माजी आमदार पी. एन. पाटील गटाच्या महिला सदस्याने माहिती अधिकाराखाली माहिती मागविली होती. याचा राग रामदास पिंजरे यांच्या मनात होता. संबंधित महिला सदस्या शनिवारी दुपारी घरासमोर एकट्याच उभ्या असताना संशयित रामदास पिंजरे, श्रेयस संभाजी पिंजरे, प्रणव प्रल्हाद पिंजरे, एकनाथ बाबूराव पिंजरे हे हातामध्ये तलवारी घेऊन आले. यावेळी रामदास व श्रेयस पिंजरे यांनी संबंधित महिलेला शिवीगाळ करीत तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दारात लावलेल्या दुचाकीची तोडफोड केली. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिल्याने वरील चौघाजणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये रामदास पिंजरे याला अटक केली. त्याचबरोबर रामदास याने दिलेल्या फिर्यादीनुसार सुजित बाबूराव पिंजरे यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे करीत आहेत. (प्रतिनिधी)