येथील श्रीराम विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्थेच्या सभापतीपदी हरी शिवा पाटील तर उपसभापती पदी संतोष रंगराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या सभागृहात ही निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सहकारी संस्था करवीरचे निबंधक बी.के. पाटील हे होते. या संस्थेवर पालकमंत्री सतेज पाटील यांची निर्विवाद सत्ता आहे.
सभापतीपदासाठी हरी पाटील यांचे नाव संचालक प्रशांत पाटील यांनी सुचवले तर विलास पिंगळे यांनी त्यास अनुमोदन दिले. उपसभापती पदासाठी संतोष पाटील यांचे नाव संचालक राजीव चव्हाण यांनी सुचवले तर मदन जामदार यांनी त्यास अनुमोदन दिले. विद्यमान सभापती धनाजी गोडसे व उपसभापती संतोष ठाणेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे संचालक मंडळाच्या सभेत ही बिनविरोध निवड करण्यात आली.
०८ हरी पाटील, संतोष पाटील