मलकापूर : कोपार्डे (ता. शाहूवाडी) येथील महिलेचा विनयभंग व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अजित उर्फ बारक्या केरबा कारंडे (वय ४५) याच्याविरोधात शाहूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित पिडीत महिला ही तिच्या आईकडे जळण आणण्यासाठी जात असताना देवाचा वड येथे पाठीमागून येऊन जबरदस्तीने अजितने महिलेचा हात धरून रस्त्याकडेला असणाऱ्या गुरव यांच्या शेतातील पिंजराच्या होळीच्या आडोशाला नेऊन शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. दरम्यान, संबंधित महिलेने त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. त्यानंतर पीडिता राहात असलेल्या गल्लीत येऊन संबधिताने फिर्यादीची माफी मागत असताना ‘तू त्या लायकीचा नसल्याचे पीडितेने आरोपीला म्हटल्यानंतर तिला जातीवाचक शिवीगाळ करून ‘तुला बघून घेतो’, अशी धमकी दिल्याचेही पीडितेने फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस उपअधीक्षक अनिल कदम करत आहेत.
कोपार्डेत महिलेचा विनयभंग, जातीवाचक शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:23 IST