शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

‘रमजान ईद’ मुबारक हो !

By admin | Updated: July 18, 2015 00:13 IST

आज ईद : मुस्लिम बोर्डिंग येथे साडेनऊ वाजता नमाज पठण

कोल्हापूर : मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण आज, शनिवारी सर्वत्र साजरा होत आहे. यानिमित्त मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर सकाळी साडेनऊ वाजता मुफ्ती इर्शाद कुन्नुरे हे पहिल्या जमातसाठी नमाज व खुदबा पठण करणार आहेत. सणाच्या पूर्वसंध्येला पावसाचा अंदाज घेत मुस्लिम बांधवांनी ईदसाठीच्या साहित्य, कपड्यांची खरेदी केली. सालाबादप्रमाणे हिलाल कमिटी (चाँद कमिटी) ची बैठक मौलाना मन्सूर आलम कासमी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात मुंबई, लखनौ, रत्नागिरी, हैदराबाद तसेच अन्य शहरांशी संपर्क साधण्यात आला. तेथे चंद्र दर्शनाची साक्ष मिळाल्याने आज, शनिवारी ईद साजरी करण्याचा निर्णय झाला. यावेळी मौलाना अब्दुल सलाम कासमी, बशीर नायकवडी, मौलाना नाझीम, आदी उपस्थित होते. सणाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या होत्या. ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठाही मोठ्या प्रमाणात सजल्या होत्या. पठाणी झब्बा आणि लेंगा, तरुणाईसाठी ब्रँडेड कपडे, अत्तर, ईदचा खास मेन्यू असणाऱ्या शिरकुर्म्यासाठी काजू, बदाम, पिस्ते, चारोळी, मनुका यांच्या खरेदीसाठी महापालिका परिसरातील दुकानांमध्ये मोठी गर्दी झाली होती. स्पेशल भाजक्या मिरज शेवया यासाठी महाद्वार रोड, राजारामपुरी, आदी ठिकाणीही खरेदीसाठी गर्दी झाली होती. ईदची खरेदी ‘एकाच छताखाली’ व्हावी, या उद्देशाने शहरातील विविध ठिकाणी ईद फेस्टिव्हल भरविले आहेत. याठिकाणी ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर साहित्यांची विक्री केली जात असल्याने मुस्लिम बांधवांचा याठिकाणी खरेदी करण्याकडे जास्त ओढा होता. ( प्रतिनिधी )शहरातील मस्जिदीमधील नमाज पठणाची वेळ अकबर मोहल्ला मस्जिद :सकाळी ८.३०गवंडी मोहल्ला मस्जिद : ८.४५कब्रस्तान मस्जिद, राजेबागस्वार, बाराईमाम, टाकाळा, रंकाळा मस्जिद, विक्रमनगर मस्जिद, बाबूजमाल मस्जिद : ९.००उत्तरेश्वर मस्जिद : ९.१५घुडणपीर मस्जिद, बडी मस्जिद, यादवनगर मस्जिद : ९.३०कसाब मस्जिद, निहाल मस्जिद मर्कज : ९.४५