शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगले मैदानात चेहरे तेच, ब्रॅँड बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 00:02 IST

अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदार संघात खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात ...

अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदार संघात खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात मंत्री सदाभाऊ खोत यांनी शड्डू ठोकला आहे. भाजप-शिवसेना युती झाली तर, हा मतदार संघ शिवसेनेला मिळणार, या भूमिकेतून माजी खासदार निवेदिता माने यांनी शिवधनुष्य उचलून आघाडी काँग्रेसवर कडी केली आहे. यामुळे होणाऱ्या लढती पारंपरिक असल्या तरी नेते तेच, पक्षाचा ब्रँड मात्र बदलला आहे.गत लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मोदी लाटेची हवा पाहूनच भाजपच्या महाआघाडीला पाठिंबा दिला. यावेळी स्वत: हातकणंगले आणि सदाभाऊ खोत यांना माढा लोकसभा मतदार संघ दिला. या तहात शेट्टी जिंकले अन् खोत हरले. खोत यांनी राष्ट्रवादीचे मातब्बर विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशी काट्याची लढत दिली. याचेच बक्षीस म्हणून खासदार राजू शेट्टी यांच्याच शिफारशीने खोत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले. तेच दोघे आता एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या पहिल्याच लोकसभेला हातकणंगले मतदार संघामधून निवेदिता माने यांचा पराभव केला होता. याचा वचपा काढण्यासाठी गत लोकसभा निवडणुकीत निवेदिता माने यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची उमेदवारी मागितली. परंतु राष्ट्रवादीने धोका ओळखून ही उमेदवारी काँग्रेस म्हणजेच कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या गळ्यात टाकली. परंतु नरेंद्र मोदी यांच्या लाटेपुढे आघाडी काँग्रेसचा निभाव लागला नाही व त्यांचे पानिपत झाले. आता हीच अवस्था २०१९ च्या निवडणुकीत भाजपची होणार आहे. त्यांच्याकडे सदाभाऊ खोत यांच्याशिवाय दुसरा तगडा उमेदवार नाही, असे रयत क्रांती संघटनेच्या नेत्यांना वाटते. म्हणूनच मंत्री खोत शेट्टी यांना आव्हान देत आहेत.दुसरीकडे मात्र आघाडी काँग्रेसला खासदार राजू शेट्टी यांच्यासारखा खमक्या उमेदवार मिळाला आहे. त्यामुळे माजी खासदार निवेदिता माने यांचा गट अस्वस्थ झाला आहे. याच रागातून निवेदिता माने यांनी शिवसेनेत प्रवेश करून खासदार शेट्टी यांना आव्हान देण्याची खेळी केली आहे. परंतु आगामी लोकसभेला भाजप-शिवसेना युती झाली नाही, तर शेट्टी यांच्याविरोधात धैर्यशील माने, सदाभाऊ खोत यांनाच लढावे लागेल. या लढती पारंपरिकच आहेत, परंतु त्यांच्या पक्षांचे ब्रँड मात्र वेगवेगळे आहेत.‘रयत’च्या पाठीवर : भाजपची झूलखासदार राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे असले तरी, त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा ब्रँड पसंत केला आहे; तर त्यांचे शिष्य सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेच्या पाठीवर भाजपची झूल पांघरली आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील भाजप, शिवसेनेच्या आमदारांची ताकद पाहून माजी खासदार निवेदिता माने यांनी थेट शिवसेनेचे धनुष्य पेलून पराजयाचा वचपा काढण्याचा डाव आखला आहे.