शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

नेज बिनविरोधची मदार अपक्ष उमेदवारांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:25 IST

कुंभोज : अशोक खाडे : नेज (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अकरा जागांसाठी दाखल झालेल्या ४९ उमेदवारी अर्जांपैकी ...

कुंभोज : अशोक खाडे :

नेज (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अकरा जागांसाठी दाखल झालेल्या ४९ उमेदवारी अर्जांपैकी सर्व अर्ज वैध ठरले आहेत. येथे स्थानिक गटांचे प्राबल्य असून, शह-काटशहाच्या राजकारणामुळे पक्षीय आघाड्या विस्कटलेल्या आहेत. त्यातून काॅंग्रेस सोबत भाजप, तर शिवसेना स्वतंत्रपणे लढणार असून, स्वाभिमानी शेतकरी संघटना सध्य:स्थितीत तटस्थ दिसून येत आहे. तथापि, दुसरीकडे बिनविरोध करण्यासाठी सुद्धा सर्व नेतेमंडळी कंबर कसत असून, बिनविरोधची मदार केवळ आता दहा अपक्षांवर येऊन ठेपली आहे.

येथे चार प्रभागांतील अकरा जागांसाठी निवडणूक होत असून, बिनविरोधसाठी सुरुवातीपासूनच नेत्यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्याला आता गती आली आहे. तिसऱ्या बैठकीदरम्यान अपक्षांकडून बिनविरोधसाठी हात पुढे आल्यास नेते आश्वासक बनले असून, तसे न घडल्यास मात्र निवडणुक होणार हे चित्रही स्पष्ट दिसून येत आहे. येथील गतवेळची लढत काॅंग्रेसचे रवींद्र खोत, भाजपचे बी. एस. गारे तसेच शिवसेनेचे बी. एल. शिंगे , आप्पासाहेब एडके यांच्या आघाडीशी माजी पं. स. सदस्य बी. जे. पाटील, माजी सरपंच सुनील देशमुख, संग्रामसिंह निंबाळकर यांची आघाडी दरम्यान झाली होती. तथापि, बदललेल्या पक्षीय आघाडींनुसार बी. एस. गारे यावेळी शिवसेनेऐवजी काॅंग्रेस आघाडीसोबत राहिले आहेत. बी. जे. पाटील व बी. एस. गारे आघाडीत एकत्र आले आहेत. स्थानिक गट विस्कटले असून, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष आप्पासो एडके यांची मात्र यावेळी थोडी गोची झाली आहे. शिवपुरीत तीन अपक्षांची स्वतंत्र आघाडी होणार आहे. नेज सेवा संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, आप्पासाहेब एडके यांच्या प्रमुख पुढाकाराने बी. एस. गारे, बी. एल. शिंगे, रवींद्र खोत, सुनील देशमुख, संग्रामसिंह निंबाळकर ही नेतेमंडळी बिनविरोधसाठी कंबर कसत असून, परस्परांत जागा वाटप समजुतीने करण्याचे ठरवून अपक्षांची साथ मिळविण्यासाठी सकाळ-संध्याकाळ बैठका होत आहेत.

एकंदरीत सर्व नेत्यांनी बिनविरोधसाठी बिनशर्थपणे हातात हात दिले आहेत. दहा पैकी दोन अपक्षांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीकडे पाठ फिरविली. उर्वरितांपैकी विशेषतः तीन अपक्षांना हाताळण्याचे दिव्य नेत्यांपुढे आहे. त्यांच्या प्रतिनिधित्वाबाबत काही विचार झाल्यास निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग सुकर होईल. अन्यथा सर्वजण मिळून अपक्षांविरुद्ध लढतील, असे सार्वत्रिक चित्र दिसून येत आहे.

एकूण प्रभाग- ४

एकूण मतदान- ३७८०

एकूण जागा- ११

चौकट- निवडणुक ग्रामपंचायतीची... किंमत एका मताची..!

तंटामुक्त तसेच ग्रामस्वच्छता अभियानात राज्यस्तरीय बक्षीसपात्र नेज गावची प्रत्येक निवडणुक अटीतटीची होते. २००५ च्या निवडणुकीत तर एका मताधिक्याच्या जोरावर एक जागा अधिक जिंकून ग्रामपंचायतीत सत्तांतर घडले होते. त्यापासून इथल्या गटनेत्यांपासून कार्यकर्ते, उमेदवार तसेच मतदारांत एका मताच्याही किमतीची चर्चा मात्र पंधरा वर्षांनंतर आजही निवडणुकीच्या निमित्ताने गावात होत आहे.