हणबरवाडी (ता. भुदरगड) येथील सरपंच धनाजीराव महादेव खोत (वय ४७) यांचे कोरोनाने निधन झाले. भुदरगड तालुका सरपंच संघटनेचे ते अध्यक्ष व आमदार प्रकाश आबिटकर यांचे ते विश्वासू सहकारी होते. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात कोरोनाच्या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
महाविद्यालयात शिकत असल्यापासून धनाजीराव खोत हे आमदार आबिटकर यांच्या सोबत होते. महाविद्यालयात निवडणूक करता करता खोत यांनी गावातील राजकारणात प्रवेश केला. गेली पंचवीस वर्षे त्यांनी गावावर आपली राजकीय सत्ता प्रस्थापित केली आहे. त्यांच्या जाण्याने आमदार आबिटकर गटात एक विश्वासू सहकाऱ्याची पोकळी निर्माण झाली आहे.
शाहू कुमार भवन गारगोटी प्रशालेच्या शिक्षिका यशोदा खोत यांचे ते पती होत.
त्यांच्या पश्चात आईवडील,पत्नी,भाऊ ,मुलगा मुलगी असा परिवार आहे.
फोटो ०९धनाजीराव खोत