शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
5
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
6
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
7
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
8
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
9
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
10
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
11
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
12
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
13
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
14
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
15
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
16
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
17
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
18
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
19
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
20
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य

गडहिंग्लजमध्ये लमाण झोपड्यांवर हातोडा !

By admin | Updated: June 8, 2014 01:15 IST

सहा तासांंची मोहीम : सात झोपड्या हटविल्या

औरंगाबाद : जेईई मेन्स परीक्षेच्या निकालापाठोपाठ बारावीचा निकाल घोषित झाला आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया अत्यंत सुरळीत पार पडावी, विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी तंत्रशिक्षण विभागाने मराठवाड्यात २८ अ‍ॅडमिशन नोंदणी तथा सेवा-सुविधा केंद्रे (ए.आर.सी. सेंटर) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात औरंगाबाद शहरातील १३ केंद्रांचा समावेश आहे.अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची लगभग सुरू झाली आहे. यंदा विद्यार्थ्यांना गुणपत्रिका १० जून रोजी मिळणार आहे. त्यानंतरच अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी या वर्षी प्रथमच तंत्रशिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी मराठवाड्यात सेवा-सुविधा आणि नोंदणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रात जाऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांसह हजर राहून नोंदणी करावी लागेल. त्यानंतर विद्यार्थ्यांना अ‍ॅडमिशन किट देण्यात येईल. या अ‍ॅडमिशन किटसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ७०० रुपये, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ५०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय तेथे अतिरिक्त ५० रुपये भरून विद्यार्थ्यांना संगणक, प्रिंटर आणि झेरॉक्सची सुविधाही मिळणार आहे. राज्यभरात २५३ प्रवेश नोंदणी केंदे्र निश्चित केली आहेत. या केंद्रप्रमुखांना तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने १३ जून रोजी मुंबईत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अशा प्रकारची प्रवेश नोंदणी केंद्रे सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे. विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुखांना याविषयीचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे तंत्रशिक्षण कार्यालयातील विशेष कार्याधिकारी डॉ. एस.एस. रगटे यांनी सांगितले.सेवा-सुविधा केंद्रांची संख्याऔरंगाबाद १३, जालना १, बीड ३, उस्मानाबादेत ३, लातूरला ३, नांदेड २, हिंगोली १, परभणी १.औरंगाबादेतील केंद्रे श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालय, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, एमआयटी कॉलेज, जेएनईसी, पीईएस अभियांत्रिकी कॉलेज, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, हायटेक अभियांत्रिकी कॉलेज, वाळूज, सावित्रीबाई महिला अभियांत्रिकी कॉलेज, इंटरनॅशनल सेंटर कॉलेज आॅफ एक्सलन्स, छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी कॉलेज आणि औरंगाबाद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचा समावेश आहे.