शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

हाळवणकर यांनाच सत्तेची मस्ती

By admin | Updated: May 31, 2016 01:18 IST

मुश्रीफ यांचा पलटवार : चिकोत्रा खोऱ्यात माझ्यामुळेच समृद्धी

कोल्हापूर : भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांना सत्तेची मस्ती आली आहे. मी काहीच करणार नाही, परंतु माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यावर टीका करण्याचे परिणाम म्हणून नियती व परमेश्वरच त्यांना धडा शिकवेल. त्यांचा घडा भरत आला आहे. ‘भगवान के दरबार मे देर हैं, लेकीन अंधेर नहीं...’ असा पलटवार राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकातून केला.रविवारी तमनाकवाडा (ता. कागल) येथील पाणी परिषदेत आमदार हाळवणकर यांनी मुश्रीफ यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. त्याला मुश्रीफ यांनी प्रत्युतर दिले आहे. मुश्रीफ म्हणतात, ‘ मेरे अंगने में तेरा क्या काम हैं..?’ हे वाक्य माझ्या पत्रकामध्ये नव्हतेच, परंतु लोकांचा माझ्यावर रोश आहे म्हणून स्वत:च्या मतदारसंघामध्ये सर्व आलबेल आहे, असे हाळवणकर यांनी समजू नये. आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इचलकरंजीकरांचा आक्रोश त्यांना दिसेलच. त्यानंतरच त्यावर भाष्य करेन. पत्रकात पुढे म्हटले आहे, ‘मी १९९९ मध्ये आमदार झालो तेव्हा चिकोत्रा प्रकल्प रखडला होता. पहिल्याच वर्षी भरीव निधी प्राप्त करून दिला. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. २००१ मध्ये तत्कालीन पाटबंधारे मंत्री अजित पवार यांच्या हस्ते कापशी येथे जलपूजन केले. चिकोत्रा खोऱ्यामधील समृद्धी खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून चालू झाली. चिकोत्रा खोऱ्यामध्येच सरसेनापती संताजी घोरपडे या शूरवीर मराठी सेनापतीच्या नावे साखर कारखाना काढून जिवंत स्मारक तर केलेच, त्याशिवाय कापशी येथे संताजी घोरपडे यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीचे काम सुरू करून चिकोत्रा खोऱ्याचा सन्मान केला. कागल विधानसभा मतदारसंघामध्ये विकासकामांचा डोंगर उभा केलाच शिवाय क्षणभरही न थकता लोकांच्यासाठी धावून जाणारा कार्यकर्ता बनलो लोकप्रतिनिधी हा कुटुंबप्रमुख असतो. कुणालाही ठेच लागली तर त्याची कळ मला येते असे नाते जपण्याचा प्रयन्त केला आहे. म्हणून माझ्यासारख्या आधुनिक मदारी म्हेत्तरला सलग चारवेळा निवडून देण्याची किमया मायबाप जनतेने केली आहे. कागल मतदारसंघ विकासाचे मॉडेल बनवण्यात मला यश आले आहे; परंतु मला कधीही सत्तेची मस्ती आली नाही. जनतेचा सेवक म्हणून काम केले आहे, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)