शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

अर्ध्यावरती प्रकल्प रखडले...अधुरी सारी कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 01:25 IST

कोल्हापूर : केवळ आणि केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावापोटी आजरा आणि भुदरगड तालुक्यातील पाच प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही पाण्याचा एकही थेंब अडलेला नाही. २0-२0 वर्षे होऊनही, प्रकल्पांच्या खर्चात पाचपट वाढ होऊनही काही ना काही कारणाने या प्रकल्पांच्या पदरात सध्यातरी वांझोटेपण पडले आहे.

ठळक मुद्देजलसिंचन प्रकल्प : वीस वर्षांनंतरही पाणी अडविण्यात अपयश,उचंगी, आंबेओहोळ, सर्फनाला, नागनवाडी, धामणीचा पेचतुमच्या भल्यासाठी वाट्टेल ते करू, असा विश्वास देण्यात कमीतीनवेळा सत्तेवर येऊन गेले तरी त्यांना हे प्रकल्प पुरे करता आले नाहीत,

समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : केवळ आणि केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावापोटी आजरा आणि भुदरगड तालुक्यातील पाच प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही पाण्याचा एकही थेंब अडलेला नाही. २0-२0 वर्षे होऊनही, प्रकल्पांच्या खर्चात पाचपट वाढ होऊनही काही ना काही कारणाने या प्रकल्पांच्या पदरात सध्यातरी वांझोटेपण पडले आहे. यातील तीन प्रकल्प हे ‘मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम’मधील असून आज, मंगळवारी याबाबत मुंबईत बैठक होत आहे. केवळ आंदोलने झाली, निवेदने दिली म्हणून बैठकीची औपचारिकता न राहता ठोस निर्णयाची अपेक्षा आहे.

१९९५ नंतर राज्यात सत्तेवर आलेल्या तत्कालीन भाजप-शिवसेनेच्या युती सरकारने कृष्णा खोरे प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक प्रकल्पांची कामे सुरू केली. मात्र, सिंचन प्रकल्पामध्येच वादग्रस्त ठरलेल्या दोन्ही काँग्रेसचे सरकार नंतर तीनवेळा सत्तेवर येऊन गेले तरी त्यांना हे प्रकल्प पुरे करता आले नाहीत, हे वास्तव आहे. आता पुन्हा युतीचे सरकार येऊन तीन वर्षे झाल्यानंतर याबाबत हालचालींना सुरुवात झाली आहे. दरम्यानच्या काळात या प्रकल्पांच्या वाढलेल्या कि मती, यातून निर्माण होणाºया सिंचन क्षमतेत झालेली दिरंगाई यामुळेच या परिसरातील शेतकºयांवर शेतीच्या पाण्यासाठी पुन्हा पावसावरच अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.

यातील उचंगी आणि आंबेओहोळ प्रकल्पांसाठी आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी अधिवेशनावेळी निदर्शने केली; परंतु त्यांची सत्ता असताना हे प्रकल्प त्यांनी मार्गी लावले असते तर मुश्रीफ यांच्याच भाषेत त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली गेली असती. माजी आमदार कै. तुकाराम कोलेकर, वाटंगीच्या अल्बर्ट डिसोझा यांनी उचंगीसाठी जसा वाईटपणा घेतला, शिव्याशाप घेतले तसा वाईटपणा घ्यायला कुणी फारसे तयार न झाल्याने हे प्रकल्प रखडले.

एकीकडे राजकीय इच्छाशक्ती कमी पडली असताना दुसरीकडे शासनही प्रकल्पग्रस्तांना आम्ही तुमच्या भल्यासाठी वाट्टेल ते करू, असा विश्वास देण्यात कमी पडले. प्रकल्पग्रस्तांना जमीन देण्याऐवजी त्यांच्याच जमिनी खोटी कागदपत्रे रंगवून राजकीय नेत्यांना विकण्याचा हरामखोरपणा काही महसूल अधिकाºयांनी केल्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा त्यांच्यावरही विश्वास राहिलेला नाही.पाठपुरावा आवश्यकनिवडणुकांसाठी मते आवश्यक असल्याने जमिनी काढून घेतल्या तर मतदारांची नाराजी, लाभधारकांच्या अतिरिक्त जमिनी काढून घेतल्या तरीही नाराजी ती पत्करण्याचे धाडस अनेकांनी न दाखविल्याने या प्रकल्पांना कुणी वालीच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. कै. बाबासाहेब कुपेकर यांनी चित्रीच्या बाबतीत जसा पाठलाग केला तसा अन्य प्रकल्पांबाबत झाला नाही.उचंगी प्रकल्प १५ कोटींवरून ५९ कोटींवरप्रकल्पस्थळ उचंगी, ता. आजरापहिली प्रशासकीय मंजुरी १३ डिसेंबर १९९६मूळ खर्च १५ कोटी १२ लाखयेणारा सुधारित खर्च ५८ कोटी ७३ लाखहोणारा पाणीसाठा १७.४८ द.ल.घ.मी.सिंचनक्षमता २५१९ हेक्टरलाभ होणारे तालुके आजरा, गडहिंग्लजपुनर्वसन स्थिती अपूर्णआवश्यक निधी २१ कोटी रुपयेआंबेओहोळकडे कमालीचे दुर्लक्षप्रकल्पस्थळ उत्तूर ता. आजरापहिली प्रशासकीय मंजुरी १६ आक्टोबर १९९८मूळ खर्च २९ कोटी ३१ लाखयेणारा सुधारित खर्च २२७ कोटी ५४ लाखहोणारा पाणीसाठा ३५.११ द.ल.घ.मी.सिंचनक्षमता ६३४२ हेक्टरलाभ होणारे तालुके आजरा, गडहिंग्लजपुनर्वसन स्थिती अपूर्णआवश्यक निधी १२0 कोटी रुपये३३ कोटींचा सर्फनाला प्रकल्प १४६ कोटींवरप्रकल्पस्थळ पारपोली, ता. आजरापहिली प्रशासकीय मंजुरी आक्टोबर १९९८मूळ खर्च ३३ कोटी रुपयेयेणारा सुधारित खर्च २२१ कोटी १८ लाख रुपयेहोणारा पाणीसाठा .६७ टीएमसीसिंचनक्षमता ३७८४ हेक्टरलाभ होणारे तालुके आजरापुनर्वसन स्थिती अपूर्णआवश्यक निधी ८२ कोटी रुपयेनागनवाडी प्रकल्प १७ वर्षे होतोयचप्रकल्पस्थळ बारवे दिंडेवाडी, ता. भुदरगडपहिली प्रशासकीय मंजुरी जानेवारी २000मूळ खर्च १२ कोटी ९३ लाख रुपयेयेणारा सुधारित खर्च ४0 कोटी ८८ लाख रुपयेहोणारा पाणीसाठा .२९९ टीएमसीसिंचनक्षमता १0६५ हेक्टरलाभ होणारे तालुके भुदरगड, कागलपुनर्वसन स्थिती अपूर्णआवश्यक निधी २५ कोटी रुपयेधामणी प्रकल्प खर्चात ६६२ कोटींची वाढप्रकल्पस्थळ राई ता. राधानगरीपहिली प्रशासकीय मंजुरी डिसेंबर १९९६मूळ खर्च १२0 कोटी ३0 लाख रुपयेयेणारा सुधारित खर्च ७८२ कोटी ३७ लाख रुपयेहोणारा पाणीसाठा १७.४८ द.ल.घ.मी.सिंचनक्षमता ३.८५ टीएमसीलाभ होणारे तालुके राधानगरी, गगनबावडा, पन्हाळापुनर्वसन स्थिती अपूर्णआवश्यक निधी ४00 कोटी रुपये