शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

सीपीआरमध्ये वर्षाला सरासरी दीडशे अ‍ॅन्जिओग्राफी

By admin | Updated: January 3, 2016 00:49 IST

सर्वसामान्यांना दिलासा : गरजूंची संख्या वाढण्याची शक्यता

कोल्हापूर : खासगी रुग्णालयांबरोबर आता येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाने (सीपीआर) अ‍ॅन्जिओग्राफीच्या दरात कपात केली आहे. या दरकपातीमुळे सर्वसामान्यांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. गतवर्षी अ‍ॅन्जिओग्राफीचे प्रमाण सरासरी दीडशे होते. एक जानेवारी २०१६ पासून अ‍ॅन्जिओग्राफीचा दर साडेसहा हजारऐवजी तीन हजार रुपये करण्यात आला आहे. जिल्ह्याची आरोग्यवाहिनी समजले जाणारे सीपीआर रुग्णालयात तत्कालीन आरोग्यमंत्री दिवंगत दिग्विजय खानविलकर यांच्या कारकिर्दीत २००१ला हृदयशस्त्रक्रिया विभाग सुरू झाला. खानविलकर यांच्या काळात सीपीआरचे रुपडे बदलले. मात्र, त्यानंतर अपुरे मनुष्यबळ, प्रशासनाची अनास्था या कारणामुळे पुन्हा २००७-१० ला या काळात विभागाला उतरती कळा आली. अ‍ॅन्जिओग्राफी, अ‍ॅन्जिओप्लास्टीच्या शस्त्रक्रिया मंदावल्या. त्याचा रुग्णसेवेवर परिणाम झाला. या प्रश्नांवर शहरातील विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था आदींनी मोर्चे, निदर्शने याद्वारे आवाज उठवून प्रशासनाला जाग आणली. सातत्याने हा अ‍ॅन्जिओग्राफी दराचा प्रश्न उचलून धरला. शुक्रवारी (दि.१) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने अ‍ॅन्जिओग्राफी यावर्षीपासून तीन हजार रुपयांत होणार असल्याचे सांगितले. मात्र, गेल्या तीन-चार वर्षांपासून महाविद्यालय प्रशासनाची अनास्था, अपुरे मनुष्यबळ व मानसेवी डॉक्टरांचे थकीत मानधन अशा विविध कारणांचा परिणाम हृदयशस्त्रक्रिया विभागाच्या रुग्णसेवेवर झाला. पण, आता अ‍ॅन्जिओग्राफीचे दर कमी केल्याने भविष्यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.