कोल्हापूर : मांडव, सहस्त्र शिवलीलामृत पठण, हळदी कार्य, दाक्षिणात्य वाद्यांचा नाद, मंगलाष्टक, कन्यादान, आतषबाजी, प्रसाद वाटप अशा धार्मिक विधींनी आणि भाविकांच्या उपस्थितीत आज, मंगळवारी रावणेश्वर महादेवांचा पार्वती गंगासमवेत विवाह सोहळा म्हणजेच कल्याण महोत्सव झाला.श्री रावणेश्वर भक्त मंडळाच्यावतीने या कल्याण महोत्सवाचे आयोजन केले होते. कोल्हापुरात पहिल्यांदाच महादेवांचा विवाह सोहळा झाला. या विधीसाठी हैदराबादमधील दिलीप शर्मा यांच्यासह आठजणांचे पथक पौरोहित्य करण्यासाठी आले होते. आज सकाळी दहा वाजता हळदी कार्य झाले. त्यानंतर विविध विधी झाले. संध्याकाळी पाच वाजता विवाह सोहळा विधीला प्रारंभ झाला. संध्याकाळी सात वाजता मंगलाष्टक झाली. त्यानंतर कन्यादान झाले. रात्री आठ वाजता गोंधळ झाला. त्यानंतर आतषबाजी करण्यात आली. उपस्थित भाविकांना लाडूप्रसाद देण्यात आला. व्यासपीठावर कैलास मानसरोवराचे नेपथ्य केले होते. उद्या सकाळी नऊ ते साडेबारा या वेळेत पूर्णाहुतीने सोहळ्याची सांगता होईल.
हळदी..मंगलाष्टक..कन्यादान.. आतषबाजी
By admin | Updated: November 12, 2014 00:41 IST