शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

शेकडो हातांनी साकारले लाडके बाप्पा

By admin | Updated: September 4, 2016 01:23 IST

शाडूची गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा : ‘लोकमत बाल विकास मंच’तर्फे आयोजन

कोल्हापूर : ‘ग..ग.. गणपती’ असे शाळेत शिकविले जाते. तेच लाडके बाप्पा अर्थात गणपती शुक्रवारी  (दि. २) महावीर गार्डनच्या हिरवळीवर शेकडो चिमुकल्यांच्या हातांनी मूर्तिस्वरूपात साकारले.मुलांच्या सर्जनशीलतेला व त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा; त्याचबरोबर यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने ‘लोकमत बाल विकास मंच’तर्फे शाडूची गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा झाली. ‘रावसाहेब वंदुरे ग्रुप’ हे या उपक्रमाचे प्रायोजक होते. दुपारी चार वाजता कार्यशाळेची वेळ असली तरी तीन वाजल्यांपासूनच पालकांच्या हाताला धरून चिमुकले महावीर गार्डन येथे येत होते. सुरुवातीला दळवीज् आर्टस्च्या विद्यार्थ्यांनी शाडूच्या गणेशमूर्तीचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर ‘लोकमत’तर्फे गणेशमूर्ती तयार करण्यासाठी शाडूची माती दिली होती.बालचमू गार्डनवरच्या हिरवळीवर उत्साहवर्धक वातावरणात मनातील गणेशमूर्ती घडविण्यात हरवून गेला. दोन तास चाललेल्या या कार्यशाळेत मुलांनी चमकी, टिकल्या, मोती व पानाफुलांनी सजवीत विविध आकार व प्रकारांतील देखण्या गणेशमूर्ती बनविल्या. काहींनी रंगपेटीच्या सहायाने मनसोक्त रंगही भरले. या कार्यशाळेसाठी दळवीज् आर्टस्च्या राज इंचनाळकर, नकुल कातवरे, शुभम चेचर, आकाश झेंडे, अक्षय जाधव, दूर्गा अजगावकर, अनीषा पिसाळ, पुष्पक पांढरबळे, प्रतीक्षा व्हनबट्टे, अभिषेक संत यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.या कार्यशाळेतील विजेते असे : शिवतेज जाधव, पृथ्वीराज चव्हाण, स्वराली जाधव, प्रथमेश हलिजवाले, श्रीहरी कुलकर्णी, राजनंदिनी सुभेदार, मानस चौगुले, अवनी पाटील, स्नेहा कांबळे, सोहम साळोखे, प्रियांशू बेदरे, दर्शन जाधव, दृष्टी माळी, आरव आपटे, चिन्मय कुलकर्णी, प्रणव पारधी, आरोही शिंदे, राजश्री भोसले, स्वागत गायकवाड, प्रथमेश पाटील.विजेत्यांनी आपली बक्षिसे मंगळवारी (दि. ६) सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत पूर्णिमा अपार्टमेंट, लक्ष्मीपुरी, कोंडा ओळ येथील ‘लोकमत’ कार्यालयातून घेऊन जावीत. (प्रतिनिधी)‘लोकमत’चे उपक्रम हे प्रत्येक वेळी नावीन्यपूर्ण असतात. यामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो. या कार्यशाळेमुळे मनातला गणपती प्रत्यक्षात साकारण्याची मुलांना संधी मिळाली.- विद्या चव्हाण, पालकशाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेमुळे मुलांना पर्यावरणाचे महत्त्वदेखील जाणवू लागले आहे. हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.- वृषाली पाडळकर, पालकमला गणपती आवडतो. त्यामुळे मी या कार्यशाळेत सहभाग घेतला. इथल्या वातावरणात सर्वांसोबत बाप्पा बनविताना खूप छान वाटले.- वरद लाड, सदस्य, बाल विकास मंच