शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्राचे ज्ञानतीर्थ राजाराम कॉलेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:06 IST

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे ज्ञानतीर्थ असलेल्या कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयाने स्वातंत्र्यपूर्व आणि त्यानंतरच्या काळात ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे ज्ञानतीर्थ असलेल्या कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयाने स्वातंत्र्यपूर्व आणि त्यानंतरच्या काळात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. येथून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या ‘राजारामीयन्स’ यांनी देश आणि राज्यांतील विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. जुन्या मुंबई प्रांतातील एक अगग्रण्य उच्च शिक्षण संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महाविद्यालयाने १३९ व्या वर्षात पदार्पण केले आहे.थोरले राजाराम महाराज, राजर्षी शाहू छत्रपती आणि राजाराम महाराज यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये शिक्षणाचा लाभ संपूर्ण प्रजेला मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याअंतर्गत कोल्हापूर संस्थानमध्ये सन १८४८ पासून कोल्हापूर, पन्हाळा, आळते, शिरोळ येथे दरबारच्या खर्चाने व्हर्नाक्युलर शाळा सुरू झाल्या. पहिली इंग्रजी माध्यमाची सरकारी माध्यमिक शाळा १८६७ मध्ये स्थापन झाली.या शाळेचे पहिल्यांदा राजाराम हायस्कूलमध्ये रूपांतर झाले. त्याला १८८० मध्ये राजाराम महाविद्यालयाची जोड देण्यात आली. नवव्या क्रमांकाने मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले राजाराम महाविद्यालय १९४९ मध्ये संस्थान विलीन झाल्यावर मुंबई राज्याच्या अखत्यारीत आणि १९६० मध्ये महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित झाले. राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील शासकीय महाविद्यालय म्हणून यशस्वीपणे हे महाविद्यालय वाटचाल करीत आहे. सन १८८० पासून मुंबई विद्यापीठाशी, तर पुणे विद्यापीठाच्या स्थापनेपासून नोव्हेंबर १९६२ पर्यंत पुणे विद्यापीठाशी आणि नंतर शिवाजी विद्यापीठाशी महाविद्यालय संलग्न झाले. इतिहासतज्ज्ञ प्राचार्य डॉ. बाळकृष्ण, शिक्षणतज्ज्ञ बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर, शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार, आदींच्या कुशल मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची जडणघडण झाली.या महाविद्यालयाचा परिसर ६६ एकरांचा आहे. विविध २२ इमारतींच्या माध्यमातून महाविद्यालयाचे कामकाज चालते. प्रत्येक विषयासाठी सुसज्ज, स्वतंत्र प्रयोगशाळा आहे. सव्वा लाखाहून अधिक ग्रंथसंपदा आणि नियतकालिके, स्वतंत्र अभ्यासिका आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देण्यासाठी एक हजार क्षमतेचे अत्याधुनिक सभागृह असून व्यायामशाळा, टेनिस आणि बॅडमिंटन कोर्ट, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहे आहेत. या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी घडले आहेत. त्यांपैकी काहींनी विविध क्षेत्रांत देशाचे आणि विविध राज्यांचे नेतृत्व केले आहे.बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. आणि एम.ए., एम.कॉम. अभ्यासक्रमांचे दरवर्षी २९२८ विद्यार्थी-विद्यार्थिनी या ठिकाणी शिक्षण घेतात. राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून (नॅक) सन २०१५-१६ मध्ये कॉलेजचे पुनर्मूल्यांकन झाले. त्यावेळी ‘अ’ मानांकन कॉलेजला प्राप्त झाले आहे. महाविद्यालयात प्राध्यापकांची नियुक्ती ही राज्य लोकसेवा आयोगाकडून केली जाते. विद्यार्थ्यांना उपग्रहाद्वारे दूरशिक्षण देण्याचा पहिला मान या महाविद्यालयाला मिळाला आहे. क्रमिक शिक्षणासह नागरी, प्रशासकीय सेवा, स्पर्धा परीक्षांसह व्यक्तिमत्त्व विकासासाठी येथे मार्गदर्शन केले जाते.आजपर्यंतचे प्राचार्य : सी. एच. कँडी, जे. एफ. अडेअर, आर. एस. ल्युसी, ए. डार्बी, आर. एन. आपटे, नैपाळसिंग, डॉ. बाळकृष्ण, बॅ. बाळासाहेब खर्डेकर, डॉ. अप्पासाहेब पवार, व्ही. के. गोकाक, डी. पी. पत्रावळी, आरमॅन्डो मेनेझिस, सी. डी. देशपांडे, डॉ. बी. आर. ढेकणे, जी. व्ही. असोळकर, एस. डी. बाळ, डॉ. वि. वा. करंबेळकर, डॉ. देवरस, मा. ग. मराठे, भगवंतराव देशमुख, रामकृष्ण ढमढेरे, एस. पी. बोरगांवकर, डॉ. पी. एल. मिश्रा, एस. आर. ओझरकर, व्ही. एस. पाटील, एल. आर. पत्की, डॉ. व्ही. के. क्षीरसागर, एस. पी. ननीर, एस. बी. महाराज, व्ही. बी. हेळवी, डॉ. अण्णासाहेब खेमनर.विविध क्षेत्रांतील नामवंत ‘राजारामीयन’महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा ‘राजारामीयन’ असा उल्लेख केला जातो. महादेव रानडे, बळवंत जोशी, रघुनाथ सबनीस, वामन आपटे, रघुनाथ आपटे, गोपाळ टेंबे, विष्णू विजापूरकर, गोपाळ कृष्ण गोखले, श्रीपाद बेलवलकर, न. चिं. केळकर, माधव ज्यूलियन, ना. सी. फडके, इंदिरा संत, विजया राज्याध्यक्ष, पी. सावळाराम, व्ही. के. गोकाक, पांडुरंग पाटील, गोविंद टेंबे, अण्णासाहेब लठ्ठे, वासुदेव मिराशी, खाशाबा जाधव, शामराव तेंडोलकर, पार्श्वनाथ आळतेकर, भालचंद्र वालावलकर, दिनकरराव सुर्वे, बी. जी. खेर, अप्पासाहेब पवार, विश्वनाथ पाटील, जे. पी. नाईक, विष्णुपंत घाटगे, बी. डी. जत्ती, छत्रपती शहाजी महाराज, यशवंतराव चव्हाण, बॅ. बाबासाहेब भोसले, विंदा करंदीकर, रॅँग्लर व्ही. व्ही. नारळीकर, वसंतराव गोवारीकर, शिवराम भोजे, आर. व्ही. भोसले, अरुण निगवेकर, जयसिंगराव पवार, माणिकराव साळुंखे, विश्वास नांगरे-पाटील, तेजस्विनी सावंत, आदी नामवंत राजारामीयन आहेत.