शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

गुरू-शिष्यांमध्ये रंगतोय कलगीतुरा

By admin | Updated: March 24, 2015 00:19 IST

सहकारातील निवडणुका : राधानगरी, भुदरगडमध्ये राजकीय हवा तापली

निवास पाटील - सोळांकूर -जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ, भोगावती व बिद्री साखर कारखान्यांच्या निवडणुकींची धांदल सुरू झाल्याने राधानगरी, भुदरगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गुरू-शिष्य असणाऱ्या आजी-माजी आमदारांमध्ये कलगीतुरा रंगत आहे. यामुळे दोन्ही तालुक्यांत नव्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.जिल्हा बँकेचे ठराव गोळा करण्यात राधानगरीमध्ये ‘राष्ट्रवादी’चे ए. वाय. पाटील यांनी, तर भुदरगडमध्ये ‘राष्ट्रवादी’चे माजी आमदार के. पी. पाटील यांनी आघाडी घेतली आहे. सर्वाधिक ठरावधारक आपल्या पाठीशी असल्याचा दावा दोघांनीही केला आहे. मात्र, त्यांना रोखण्यासाठी विरोधी मंडळी ठरावाची गोळाबेरीज करू पाहत आहेत.गोकुळ दूध संघास मदत करण्याच्या पार्श्वभूमीवर ‘राधानगरी’चे प्रतिनिधित्व करणारे विद्यमान संचालक अरुण डोंगळे, भुदरगडमधून संचालक धैर्यशील देसाई, दिनकर कांबळे यांच्या माजी आमदार बजरंग देसाई गटाने विधानसभेला माजी आमदार के. पी. पाटील यांना मदत केली, तर ‘राधानगरी’चे दुसरे प्रतिनिधी पी. डी. धुंदरे यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांना छुपी मदत केली. आता काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादींसह सर्वच गटांनी सत्तारूढ गटाकडे ठराव देऊ केले आहेत. त्याची झळ बसायला स्थानिक पातळीवर आतापासूनच सुरू आहे. दोन्ही साखर कारखान्यांच्या वाढीव सभासदांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. बिद्री साखर कारखान्याच्या साखर विक्रीबाबत साशंकता असून, ढपला संस्कृती बोकाळलेली असल्याचा दावा विरोधी गटाकडून मिळेल त्या समारंभात होत आहे.याउलट सत्तारूढ गटाकडून आरोपांचे खंडन करताना, कारखान्याचा कारभार स्वच्छ असून, सहवीजसारखा प्रकल्प सक्षमरीत्या चालू आहे. तीन वर्षांचा कारभार पाहूनच पुरस्कार दिला जातो. स्वत:ची गुऱ्हाळघरे चालविणाऱ्यांनी बोलू नये. प्रकल्पाच्या नावाखाली लाखो रुपयांची माया गोळा करणाऱ्यांनी प्रकल्प कोठे आहेत ते अगोदर दाखवावेत? असे प्रत्युत्तर दिले जात आहे.या निवडणुकीसाठी सत्तारूढ गटाकडून कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्याचे काम सुरू आहे, तर विरोधी गटाकडून नाराज कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माजी आमदार दिनकरराव जाधव हे माजी आमदार के. पी. पाटील यांचे गुरू आहेत, तर आमदार प्रकाश आबिटकर हे के. पी. पाटील यांचे शिष्य आहेत. गुरू-शिष्य असणाऱ्या आजी-माजी आमदारांचा कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. सत्तारूढ गटाकडून आमदार हसन मुश्रीफ, आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील हे राजकीय मोट बांधत आहेत. विरोधी गटातून आमदार प्रकाश आबिटकर, संजयबाबा घाटगे, संजय मंडलिक, दिनकर जाधव, विजयसिंह मोरे, आदी मंडळी सक्रिय झाली आहेत.समीकरणे बदलणारतालुक्यांत नव्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हेजिल्हा बँक, गोकुळ दूध संघ, भोगावती व बिद्री साखर कारखान्यांच्या निवडणुकींसाठी मोर्चेबांधणीया निवडणुकीसाठी सत्तारूढ गटाकडून कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्याचे काम सुरू आहे, तर विरोधी गटाकडून नाराज कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.