शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गुरू-शिष्यांमध्ये रंगतोय कलगीतुरा

By admin | Updated: March 24, 2015 00:15 IST

सहकारातील निवडणुका : राधानगरी, भुदरगडमध्ये राजकीय हवा तापली

निवास पाटील - सोळांकूर  जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ, भोगावती व बिद्री साखर कारखान्यांच्या निवडणुकींची धांदल सुरू झाल्याने राधानगरी, भुदरगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गुरू-शिष्य असणाऱ्या आजी-माजी आमदारांमध्ये कलगीतुरा रंगत आहे. यामुळे दोन्ही तालुक्यांत नव्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.जिल्हा बँकेचे ठराव गोळा करण्यात राधानगरीमध्ये ‘राष्ट्रवादी’चे ए. वाय. पाटील यांनी, तर भुदरगडमध्ये ‘राष्ट्रवादी’चे माजी आमदार के. पी. पाटील यांनी आघाडी घेतली आहे. सर्वाधिक ठरावधारक आपल्या पाठीशी असल्याचा दावा दोघांनीही केला आहे. मात्र, त्यांना रोखण्यासाठी विरोधी मंडळी ठरावाची गोळाबेरीज करू पाहत आहेत.गोकुळ दूध संघास मदत करण्याच्या पार्श्वभूमीवर ‘राधानगरी’चे प्रतिनिधित्व करणारे विद्यमान संचालक अरुण डोंगळे, भुदरगडमधून संचालक धैर्यशील देसाई, दिनकर कांबळे यांच्या माजी आमदार बजरंग देसाई गटाने विधानसभेला माजी आमदार के. पी. पाटील यांना मदत केली, तर ‘राधानगरी’चे दुसरे प्रतिनिधी पी. डी. धुंदरे यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांना छुपी मदत केली. आता काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादींसह सर्वच गटांनी सत्तारूढ गटाकडे ठराव देऊ केले आहेत. त्याची झळ बसायला स्थानिक पातळीवर आतापासूनच सुरू आहे. दोन्ही साखर कारखान्यांच्या वाढीव सभासदांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. बिद्री साखर कारखान्याच्या साखर विक्रीबाबत साशंकता असून, ढपला संस्कृती बोकाळलेली असल्याचा दावा विरोधी गटाकडून मिळेल त्या समारंभात होत आहे.याउलट सत्तारूढ गटाकडून आरोपांचे खंडन करताना, कारखान्याचा कारभार स्वच्छ असून, सहवीजसारखा प्रकल्प सक्षमरीत्या चालू आहे. तीन वर्षांचा कारभार पाहूनच पुरस्कार दिला जातो. स्वत:ची गुऱ्हाळघरे चालविणाऱ्यांनी बोलू नये. प्रकल्पाच्या नावाखाली लाखो रुपयांची माया गोळा करणाऱ्यांनी प्रकल्प कोठे आहेत ते अगोदर दाखवावेत? असे प्रत्युत्तर दिले जात आहे.या निवडणुकीसाठी सत्तारूढ गटाकडून कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्याचे काम सुरू आहे, तर विरोधी गटाकडून नाराज कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माजी आमदार दिनकरराव जाधव हे माजी आमदार के. पी. पाटील यांचे गुरू आहेत, तर आमदार प्रकाश आबिटकर हे के. पी. पाटील यांचे शिष्य आहेत. गुरू-शिष्य असणाऱ्या आजी-माजी आमदारांचा कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. सत्तारूढ गटाकडून आमदार हसन मुश्रीफ, आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील हे राजकीय मोट बांधत आहेत. विरोधी गटातून आमदार प्रकाश आबिटकर, संजयबाबा घाटगे, संजय मंडलिक, दिनकर जाधव, विजयसिंह मोरे, आदी मंडळी सक्रिय झाली आहेत.समीकरणे बदलणारतालुक्यांत नव्याने राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हेजिल्हा बँक, गोकुळ दूध संघ, भोगावती व बिद्री साखर कारखान्यांच्या निवडणुकींसाठी मोर्चेबांधणीया निवडणुकीसाठी सत्तारूढ गटाकडून कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्याचे काम सुरू आहे, तर विरोधी गटाकडून नाराज कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.