शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गुरुपौर्णिमेला नृसिंहवाडीत लाखांवर भाविक

By admin | Updated: July 10, 2017 00:27 IST

गुरुपौर्णिमेला नृसिंहवाडीत लाखांवर भाविक

लोकमत न्यूज नेटवर्कनृसिंहवाडी : दत्तभक्तांच्या अलोट गर्दीत ‘दिगंबरा दिगंबरा...’च्या अखंड नामस्मरणात व ‘श्री गुरुदेव दत्त’च्या गजरात श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा-पंचगंगा संगमतीर्थावर गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली. लाखावर भाविकांच्या हजेरीने दत्तमंदिर गर्दीने फुलून गेले होते. दुपारी बारानंतर वाढलेली भक्तांची गर्दी रात्रीपर्यंत होती. सध्या चालू असलेल्या कन्यागत महापर्वकालाच्या अनुषंगाने भाविकांनी स्नान करून दर्शन घेतले.रविवारी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्त मंदिरात पहाटे साडेचार वाजता काकडआरती व पूजा झाली. सकाळी सात ते बारा यावेळेत भक्तांकडून ‘श्रीं’ना पंचामृताने अभिषेक करण्यात आला. दुपारी साडेबारा वाजता श्रींचे चरणकमलावर महापूजा करण्यात आली. त्यानंतर भजनी मंडळांनी भजन केले. तीन वाजता पवमान पंचसूक्तांचे पठण करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता ह.भ.प. शरदबुवा घाग यांचे टेंब्ये स्वामी मठात कीर्तन झाले. रात्री ९ नंतर दत्त मंदिरात आरती होऊन इंदुकोटी स्तोत्र, पदे म्हणण्यात आली. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा, आदी राज्यांतून असंख्य भक्तगणांनी हजेरी लावली व गुरुचरणाचे दर्शन घेऊन गुरुपूजन, जप, जाप्य, तसेच अनुष्ठान करून गुरुंचे आशीर्वाद घेतले.सांगली, मिरज, इचलकरंजी, उगार आदी अनेक भागांतून भाविक दत्त दर्शनासाठी चालत होते. टू व्हीलरवरून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय होती. भाविकांच्या सोयीसाठी दत्त देव संस्थानने दर्शनरांग, मुखदर्शन व्यवस्था, दुपारी व रात्री महाप्रसाद, आदी व्यवस्था केली होती. ग्रामपंचायतमार्फत पार्किंग, दिवाबत्ती आरोग्य व्यवस्था, जंतुनाशक फवारणी, साफसफाई, आदी सोयी-सुविधा करण्यात आल्या होत्या. सर्व व्यवस्थेवर दत्त देव संस्थानचे अध्यक्ष राजेश खोंबारे, सचिव दामोदर संतपुजारी, सरपंच अरुंधती जगदाळे, उपसरपंच धनाजी जगदाळे लक्ष ठेवून होते. मंदिर व परिसरात आवश्यक पोलीस बंदोबस्त होता.एस. टी. व्यवस्था खोळंबलीकुरुंदवाड एस. टी. आगाराने कोल्हापूर, संभाजीनगर, कागल, इचलकरंजी, सांगली, मिरज, गगनबावडा, आदी आगारांच्या साह्याने सर्वच मार्गावर ५० हून अधिक जादा बसफेऱ्यांची व्यवस्था केली होती. मात्र, कुरुंदवाड-नृसिंहवाडी मार्गाकडेलाच भक्तांनी मोठ्या प्रमाणात वाहने पार्किंग केल्याने वाहतून ठप्प झाली. परिणामी अनेक बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. बस वेळेवर न धावल्याने प्रवाशांना तासन्तास बसस्थानकावर उभे राहावे लागले.