शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

गुरुकुल परीक्षेच्या नावावर लूट

By admin | Updated: February 16, 2016 00:07 IST

चंदगड तालुक्यातील प्रकार : बंदीची पालकांची निवेदनाद्धारे मागणी

चंदगड : कोल्हापूर येथील गुरुकुल एज्युकेशन सोसायटीने पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेण्याच्या नावाने चंदगड तालुक्यातील विद्यार्थ्यांची अक्षरक्ष: लूट चालविली आहे. शिक्षण विभागाने अशा बेकायदेशीर स्पर्धा परीक्षा घेण्यावर बंदी आणावी, अशी मागणी पालकांनी निवेदनातून शिक्षण विभागाकडे केली आहे.कोल्हापूर येथील गुरुकु ल एज्युकेशन सोसायटी शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांची गरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा गेली दोन वर्षे घेत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून ३७० रुपये फी म्हणून घेऊन त्या बदल्यात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका व पुस्तके देण्यात येतात.चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा येथील व्ही. के. चव्हाण महाविद्यालयातील केंद्रावर ही परीक्षा घेतली. तालुक्यातील ३०० हून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. मात्र, गुरुकुलचे संयोजकच ११ ऐवजी ११.४५ ला परीक्षा केंद्रावर आले. परीक्षा होणार की नाही या विवंचनेत पालक व विद्यार्थी होते. एकाच वर्गात ३०० विद्यार्थ्यांना परीक्षेस बसवून परीक्षा घेत होते. मात्र, यावेळी पालकांनी विरोध केल्यानंतर विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था केली.विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रश्नपत्रिकेमध्येही १० ते १२ प्रश्न चुकीचे होते. गलथान व्यवस्थापन असलेल्या गुरुकुलचे कोणीही प्रतिनिधी यावेळी उपस्थित नव्हते. पदवीधर युवकांना हाताशी धरून कमिशन बेसिसवर या युवकांना गुरुकुलच्या संयोजकांनी कामावर ठेवले आहे. हे युवक तालुक्यातील प्रत्येक शाळांमध्ये जाऊन स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर परीक्षा असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवावे, असे आवाहन करतात. तसेच परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे पेपर न तपासताच आपल्या मर्जीतील विद्यार्थ्यांनाच मेरिटमध्ये बसविले जाते, असा आरोप पालकांनी केला असून, विद्यार्थ्यांकडून फी उकळण्याचा हा उद्योग शिक्षण विभागाने बंद करावा, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.निवेदनावर बापू शिरगावकर, डॉ. पराग जोशी, रवींद्र गणाचार्य, सुधीर सावंत, मंगल पाटील, ज्योती शिनोळकर, सीमा सावंत, सुप्रिया पाटील, नीता पाटील, डॉ. संदीप चव्हाण, गजानन पाटील, शिवकुमार मिश्रकोटी, युवराज पाटील, मोतिराम भोगण, रामचंद्र सुतार, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)