शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खाद्यावर बदूक ठेवून चालवली 'गोळी'
3
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
4
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
5
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
6
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे
7
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
8
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
9
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
10
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
11
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
12
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
13
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
14
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
15
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
16
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
17
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
18
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
19
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
20
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...

गुरुजींचा आनंद पोटात मावेना...!

By admin | Updated: January 14, 2016 00:46 IST

लाड-पाटीलवरील कारवाई : निलंबन शक्य, कर्मचारी ‘ओळखपत्रात’

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक विनायक आप्पासाहेब पाटील, वरिष्ठ सहाय्यक विकास दत्तात्रय लाड यांना लाचलुचपत विभागाकडून रंगेहात पकडल्याचा जिल्ह्यातील शिक्षकांना अक्षरक्ष: अत्यानंद झाला. फार लूट सुरू होती, आता थोडा तर चाप लागेल, अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. कार्यालयातील कर्मचारी इतकी राजरोस लूट करीत असताना त्यांचे विभागप्रमुख व मुख्य कार्यकारी अधिकारीही त्याकडे कसे काय डोळेझाक करीत होते, अशीही विचारणा आता होऊ लागली आहे. दरम्यान, या दोघांवर अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार यांना कारवाईचे अधिकार आहेत. बुधवारी दिवसभर माध्यमिक शिक्षण विभागात सन्नाटा होता. विनायक व विकास यांच्या ‘कारनाम्यां’चीच जिल्हा परिषदेत चर्चा सुरू राहिली. लाड याच्या मग्रुरीचा त्रास शिक्षकांना होत होता. वरिष्ठ वेतनश्रेणीचे काम आले की तो पहिल्यांदा फाईल रागाने फेकायचा. मग अर्जदार विनंती, विनवणी करत असे. मग मांडवली झाली की फाईल पुढे सरकली जाई. वरिष्ठ वेतन श्रेणीचा प्रस्ताव असेल तर किमान साडेतीन हजारांपासून पाच हजारपर्यंत रक्कम उकळली जाई. कोणही भेटायला आले की राजकीय पुढाऱ्यांची नांवे घेत असे. त्यांच्याशी जवळीक असल्याचा देखावा करे. पैशाशिवाय एकही काम होत नसे असा अनुभव होताच शिवाय वागणूकही मग्रुरीची होती. त्यामुळे लाच प्रकरणी कारवाई झाल्यावर अनेकांनी आनंद व्यक्त केला. वरिष्ठ वेतनश्रेणीचा आदेश काढण्यासाठी कनिष्ठ लिपिक विनायक पाटील याने तक्रारदार शिक्षकाकडे लाचेची मागणी केली होती. मात्र, लाच लाड यांनी स्वीकारली. त्याप्रकरणी लाचलुचपत विभागाचे पोलिसांनी मंगळवारी लाड व पाटील यांना पकडले. हे दोघेही जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत. ४८ तासांपेक्षा अधिक काळ पोलीस कोठडीत राहिल्यास निलंबन करणे बंधनकारक आहेत. त्यामुळे कारवाई सुरू असतानाच विनायकप्रमाणे काहीजण कोठडीची हवा नको म्हणून पसार होतात. मात्र, कोठडीत न राहिल्यासही प्रकरणाचे गांभीर्य पाहून निलंबित करता येते. दोघांवरील कारवाईचा अहवाल सामान्य प्रशासनाकडे येईल. त्यानंतर सामान्य प्रशासन पुढील कारवाईसाठी सीईओ सुभेदार यांच्याकडे प्रस्ताव सादर करेल. सीईओं अंतिम कारवाईचा आदेश काढतील. त्यामुळे पुढील कारवाईसाठी सामान्य प्रशासनास लाचलुचपत विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. लाचप्रकरणासंबंधी दिवसभर सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांत चर्चा सुरू होती. कार्यालयात कामानिमित्त आलेले कोण आणि कर्मचारी कोण, हे ओळखत नाहीत. त्यामुळे सामान्य प्रशासनाच्या सूचनेनुसार कर्मचारी गळ्यात ओळखपत्र अडकवून फिरताना दिसत होते. माध्यमिक शिक्षण विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांनी कारवाईचा धसका घेतला. आज अहवाल : सहकाऱ्यांचे जामीनासाठी प्रयत्न या दोघांनी लाच घेतल्याच्या कारवाईचा आज, गुुरुवारी लाचलुचपत विभागातर्फे जिल्हा परिषद प्रशासनास अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक उदय आफळे यांनी सांगितले. बुधवारी माध्यमिक विभागातील लाड व पाटील बसत असलेली खुर्ची रिकामी होती. दोघांना जामीन मिळावा, यासाठी काही खाबुगिरीत पटाईत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी पडद्याआड राहून प्रयत्न केले.