शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

गुंड स्वप्निल तहसीलदार गजाआड

By admin | Updated: July 31, 2015 01:21 IST

फ्लॅट फोडून कारवाई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई

कोल्हापूर : खून, खुनाची सुपारी घेणारा एस.टी. गँगचा म्होरक्या स्वप्निल संजय तहसीलदार (वय ३५, रा. श्रीरंग अपार्टमेंट, महाडिक वसाहत, रुईकर कॉलनी, कोल्हापूर) याच्या गुरुवारी शाहूपुरी पोलिसांनी सायंकाळी फ्लॅटचा दरवाजा फोडून मुसक्या आवळल्या. तहसीलदारच्या मुसक्या आवळल्याचे समजताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. तीन पोलीस निरीक्षक व पन्नास पोलीस कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्याने ही कारवाई केली. पोलिसांनी त्याच्या गळपट्टीला धरून जिन्यावरून त्याला फरफटत आणले. त्यामुळे त्याचा रुबाब चांगलाच उतरला. तहसीलदारचा मुस्कॉन लॉन येथे २ मे २०१५ रोजी वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होता. त्यावेळी त्याने पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला होता. परंतु तो पोलिसांना चकवा देत होता. त्याला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले. याबाबत पोलिसांनी सांगितले की, महाडिक वसाहतीतील स्वप्निल तहसीलदार हा एस.टी. गँगचा म्होरक्या आहे. सुपारी घेऊन खून करणे, खुनाचा प्रयत्न, दरोडा घालणे, असे विविध प्रकारचे गुन्हे त्याच्यावर पोलीस दफ्तरी नोंद आहेत. खून प्रकरणातील संशयित आरोपींना जामिनावर सोडण्यात त्याचा सहभाग होता. त्यामुळे त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस प्रयत्नशील होते. त्यातच गेल्या आठवड्यात त्याचा थेट डी गँगशी संबंध असल्याची चर्चा वृत्तपत्रांतून झाल्यावर पोलीस त्याच्या मागावरच होते. मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर सदर बाजार येथील शाहू कॉलेज ते मस्जिद या परिसरात सायंकाळी पोलिसांनी संचलन केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी, तहसीलदार याला घरात जाऊन पकडायचे आहे, असे सांगून जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख, राजारामपुरीचे निरीक्षक अमृत देशमुख यांच्यासह सुमारे ५० पोलिसांचा फौजफाटा घेऊन ते महाडिक वसाहतीकडे वळले. येथील श्रीरंग अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर घरामध्ये त्याची आई व पत्नी होती. तो दुसऱ्या खोलीमध्ये दार लावून बसला. पोलीस आल्याचे पाहताच आईने आरडाओरडा सुरू केला व कारवाईस विरोध केला. यावेळी पोलिसांनी स्वप्निलला शरण येण्यास सांगितले. परंतु, त्याने विरोध दर्शविला. शेवटी दार मोडून स्वप्निलला जेरबंद केले. त्यानंतर त्याला फरफटतच पोलिसांनी जिन्यावरून खाली आणले. अचानक झालेल्या कारवाईमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. या कारवाईत अधिकाऱ्यांसह कॉन्स्टेबल बजरंग हेब्बाळकर, अमर आडूळकर, सुहास पोवार, अशोक पाटील, किरण गावडे, सचिन पाटील, समीर मुल्ला, परशुराम गुजरे, प्रकाश परब, विलास गेंजगे, आदींनी भाग घेतला. उडी टाकण्याची आईची धमकी स्वप्निलला पोलिसांनी पकडल्यावर त्याच्या आईने दुसऱ्या मजल्यावरून उडी टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे अटकेची कारवाई काही काळ थांबली. महिला पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्याजवळ थांबवून पोलिसांनी तहसीलदारला पकडले. महापालिका निवडणूक लढविण्याचा बेत... महापालिकेचे आरक्षण व प्रभाग निश्चिती आज, शुक्रवारी आहे. या पार्श्वभूमीवर तो घरामध्ये तळ ठोकून होता. त्याने अडीच महिन्यांपूर्वी थाटामाटात वाढदिवस साजरा केला होता. त्याची ऊठबस असलेल्या कदमवाडी परिसरातून महापालिकेची निवडणूक लढविण्याचे त्याने ठरविले होते. बिनविरोध निवडून येण्यासाठी त्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, पोलिसांनी गुरुवारी सायंकाळीच त्याला अटक केली. कऱ्हाडमध्ये वाळूचा ठेका... गुंड स्वप्निल तहसीलदारने कऱ्हाडमध्ये वाळूचा ठेका घेत असल्याचे पोलिसांना सांगितले. परंतु, तो खरोखरच वाळूचा ठेका घेतो का? त्याचे अन्य व्यवसाय काय? या दृष्टिकोनातून पोलीस तपास करीत आहेत. पंचनाम्यावर आईची सही... स्वप्निलला अटक केल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचारी घराजवळ थांबून होते. अटक पंचनामा पूर्ण केल्यानंतर स्वप्निलच्या आईने घरामध्ये अटक पंचनाम्यावर सही केली. त्यानंतर सर्व पोलीस तेथून बाहेर पडले. गुन्ह्यांचा आलेख वाढताच तहसीलदारवर २००४ पासून २०१५ पर्यंत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारामारी, जबरी चोरी, गंभीर दुखापत, गर्दी व मारामारीचे १० ते १५ गुन्हे गांधीनगर, शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, आदी पोलीस ठाण्यांत नोंद आहेत. गडमुडशिंगी येथील एका व टेंबलाईवाडी उड्डाणपूल येथे झालेल्या दुहेरी खून प्रकरणात तो संशयित आहे. खून प्रकरणांतील संशयितांना बाहेर काढण्यासाठी तो पटाईत आहे. (प्रतिनिधी)