गडहिंग्लज : येथील ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित झेप अॅकॅडमीतर्फे पोलीस भरती मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्या मीना रिंगणे होत्या.
सुरेश कोरवी व शिवानंद पाटील यांनी पोलिस भरतीचा अभ्यासक्र, शारीरीक तंदुरूस्तीसाठी कोणता आहार घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी जितेंद्र बिद्रे, सीमा साठे, श्वेता टोणण्णावर, महेश मजती आदींसह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. नितेश रायकर यांनी स्वागत केले. अक्षता परीट यांनी सूत्रसंचलन केले.
------------------------
२) घाळी महाविद्यालयात कार्यशाळा
गडहिंग्लज : शहरातील डॉ. घाळी महाविद्यालयात एन.सी.सी., एन. एस. एस., सचेतना मंडळ व स्पर्धा परीक्षा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सैन्यभरती मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. अध्यक्षस्थानी प्राचार्य मंगलकुमार पाटील होते. जि. प. सदस्या अनिता चौगुले यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचा ५५ विद्यार्थिनींनी लाभ घेतला.
यावेळी अनिल मगर, राजश्री पोरे, निलेश शेळके, संतोष बाबर, अश्विन गोडघाटे, दत्तात्रय वाघमारे, मनोहर पुजारी, सरला आरबोळे, सचिन जानवेकर आदी उपस्थित होते.