शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

‘धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार गती...!’

By admin | Updated: June 21, 2016 01:16 IST

पुरोगामींची विचारणा : गोविंद पानसरे स्मृतिदिनानिमित्त ‘निर्भय बनो’ फेरी

कोल्हापूर : ‘संपविला देह जरी...संपणार नाही मती...धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार गती...!’ असा आवाज सोमवारी कोल्हापुरात निघालेल्या पुरोगामी कार्यकर्त्यांच्या ‘निर्भय बनो’ फेरीमध्ये दुमदुमला. निमित्त होते, ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या स्मरणार्थ निघालेल्या निषेध फेरीचे. दरमहा शिवाजी विद्यापीठात निघणारी ही फेरी प्रथमच पानसरे यांच्या निवासस्थानापासून शिवाजी चौकापर्यंत काढण्यात आली. त्यामध्ये सामाजिक चळवळीतील लोक मोठ्या संख्येने उस्फूर्तपणे सहभागी झाले.सागरमाळ परिसरातील पानसरे यांच्या घरापासून सकाळी सात वाजता हे फेरी सुरू झाली. ती यादवनगर, गोखले कॉलेज, सावित्रीबाई फुले रुग्णालय,आझाद चौकातून बिंदू चौकामार्गे शिवाजी चौकात आली. या दरम्यान ‘लाल सलाम...लाल सलाम... गोविंद पानसरे को लाल सलाम...’,‘लढेंगे तो जितेंगे...’अशा घोषणा देण्यात आल्या. रणजित कांबळे, कृष्णात कोरे आदींनी चळवळींतील गाणी गात फेरीमध्ये चैतन्य आणले. पुरोगामी विचारांचा हा जागर ऐकून शहरवासीयांचीही उत्सुकता ताणली. ही फेरी शिवाजी चौकात आल्यावर तिथे पानसरे-दाभोलकर व कलबुर्गी यांचे स्मरण करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. मेघा पानसरे यांनी या हत्याप्रकरणी सध्या सुरू असलेल्या तपासाबद्दल माहिती दिली. पानसरे हत्येचा तपास सीबीआयने करावा, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे; परंतु त्यांच्याकडून अजूनही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. राज्य सरकारने ती तयारी न दर्शविल्यास दि. २३ जूनच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाकडे ही मागणी करणार असल्याचे मेघा पानसरे यांनी सांगितले. या तिन्ही हत्यांमध्ये आम्ही सुरुवातीपासून जे म्हणत होतो, त्याच सनातन संस्था व हिंदू जनजागरण समितीसारख्या संस्थांचा सहभाग स्पष्ट होत आहे; परंतु पोलिसांना त्याबद्दल माहिती देऊनही त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप श्रीमती पानसरे यांनी केला.यावेळी शिवशाहीर राजू राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोवाडा म्हटला. रसिया पडळकर हिने ‘इसलिय हम राह संघर्ष की चुने...’हे गाणे म्हटले. फेरीमध्ये दिलीप पवार, व्यंकाप्पा भोसले, सुरेश शिपूरकर, नामदेव गावडे, उदय नारकर, एस. बी. पाटील,धनाजीराव जाधव, प्रा. रणधीर शिंदे, डॉ. चैतन्य शिपूरकर, निहाल शिपूरकर, सुजाता म्हेत्रे, प्रा. विलास पवार, छाया पवार, तनूजा शिपूरकर, सीमा पाटील, उमेश पानसरे, उमेश सूर्यवंशी, रमेश वडणगेकर, आर्किटेक्ट जीवन बोडके, सतीश पाटील, आदित्य खेबूडकर आदी सहभागी झाले. (प्रतिनिधी)