शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

निराधार निकिताचे महाडिकांकडून पालकत्व

By admin | Updated: June 21, 2016 01:15 IST

आत्महत्याग्रस्त पल्लवीची बहीण : शिक्षणासह सर्व सुखसोयींचा खर्च उचलणार

कोल्हापूर : लहान वयात मातेचा आधार हरपलेल्या आणि पोरक्या बनलेल्या बोंद्रेनगर येथील निकिता गणपत बोडेकर या मुलीचे ‘पालकत्व’ महाडिक उद्योगसमूहाने स्वीकारले आहे. निकिताचे जीवन सुखकर करण्यासाठी पालकत्वाच्या भूमिकेतून महाडिक उद्योगसमूह सर्वतोपरी मदत करणार असल्याचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सांगितले.फुलेवाडी रिंग रोड परिसरातील बोंद्रेनगर येथील पल्लवी गणपत बोडेकर या मुलीने रविवारी (दि. १९) छेडछाडीच्या त्रासातून गळफास घेऊन आत्महत्या केली. लहानपणीच आई-वडिलांचे छत हरपलेल्या आत्महत्याग्रस्त तरुणीच्या पश्चात एक धाकटी बहीण आणि आजारी आजी आहे. एकमेव आधार असणाऱ्या कमवत्या बहिणीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने लहान बहीण निकिता बोडेकर पोरकी झाली आहे. ती सध्या १२ वीच्या वर्गात शिकत आहे. सामाजिक बांधीलकीतून तिच्या पालकत्वाची संपूर्ण जबाबदारी महाडिक उद्योगसमूहाने स्वीकारली आहे. त्याशिवाय तिला यूथ को-आॅप. बँकेत नोकरी आणि तिच्या विवाहाचा संपूर्ण खर्चही महाडिक समूहातर्फे करण्यात येणार आहे. एकूणच, शिक्षण आणि खेळण्या-बागडण्याच्या वयात निराधार बनलेल्या निकिताचे भावी जीवन सुखी करण्यासाठी महाडिक समूह मदत करणार आहे.पल्लवीच्या घरी विविध मान्यवरांच्या भेटीफुलेवाडी : परिसरातील तरुणांच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या कलेल्या पल्लवीवर तणावपूर्ण वातावरणातच सोमवारी पहाटे अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवसभर बोंद्रेनगर परिसरात तणावपूर्ण शांतता होती. पोलिसांचा फौज फाटा धनगर वसाहतीत तैनात होता. झालेल्या घटनेची माहिती समजताच अनेक मान्यवरांनी तसेच सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पल्लवीची लहान बहीण निकीताची भेट घेऊन तिचे सांत्वन केले. यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल माने हे किशोर माने आणि राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांसह याठिकाणी आले महापौर अश्विनी रामाने, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, नगरसेविका रीना कांबळे, सारंग देशमुख, दलित महासंघाचे व्यंकप्पा भोसले, सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह उर्फ रिंकू देसाई आदी मान्यवर भेट देऊन गेले.