शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अनाथांच्या लग्नास शासन पालक

By admin | Updated: March 19, 2016 00:15 IST

तहसीलदारांनी केले कन्यादान : पुरोगामी महाराष्ट्रात घडला नवा इतिहास

आजरा : गावभेट समाधान योजनेंतर्गत आजरा तालुक्यातील कासारकांडगाव येथील मोहन रामू कांबळे व बुजवडे (ता. चंदगड) येथील शुभांगी श्रीधर कांबळे यांचा प्रशासनाच्यावतीने विवाह लावून देण्यात आला. पुरोगामी सोहळ्यातील दलित कुटुंबातील मुलींच्या कन्यादानाची जबाबदारी स्वत: तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांनी पार पडली.प्रशासकीय अधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या साक्षीने हा दिमाखदार विवाह सोहळा पार पडला. मोहन व शुभांगी दोघांच्याही घरची परिस्थिती अत्यंत बेताची. मोहनला वडील नाहीत, तर शुभांगीला आई नाही. त्यामुळे विवाहाचा विषय काढणार कोण? हा प्रमुख प्रश्न होता. विवाहाकरिता येणारा खर्च हा प्रश्न शुभांगीच्या कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेरचा होता. सर्व परिस्थिती समजावून घेऊन तहसीलदार ठोकडे यांनी शुभांगीचे कन्यादान करण्याचा निर्णय घेतला.तहसीलदारांनीच महत्त्वाची भूमिका घेण्याचे ठरविल्यानंतर गावकऱ्यांबरोबर महसूल विभागच कामाला लागला. गावकऱ्यांसह शासकीय कर्मचाऱ्यांनी जशी जमेल तशी मदत केली. माजी पंचायत समिती सदस्यांनी जबाबदारी स्वीकारून हळद, साखरपुडा याकरिता पुढाकार घेतला. गडहिंग्लज येथील हिरण्यकेशी फौंडेशनच्यावतीने कावेरी चौगुले यांनी मणी-मंगळसूत्राची जबाबदारी उचलली, तर मुलाच्या पेहराव्याचा खर्च मंडल अधिकारी म्हाळसाकांत देसाई यांनी केला. मनोहर उर्फ बंडा बापट यांनी पौराहित्य केले, तर मानसिंग देसाई यांच्यासह ग्रामस्थांनी संसारोपयोगी साहित्याकरिता हातभार लावला.या विवाह सोहळ्यास जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, उपविभागीय अधिकारी कीर्ती नलवडे, भुदरगडच्या तहसीलदार शिल्पा ओसवाल, निवासी नायब तहसीलदार डी. डी. कोळी, सहायक गटविकास अधिकारी एस. एस. भोसले, परिक्षेत्र वनअधिकारी राजन देसाई या शासकीय अधिकाऱ्यांसह सभापती विष्णुपंत केसरकर, उपसभापती दीपक देसाई, जि. प. सदस्या संजीवनी गुरव, पं. स. सदस्या अनिता नाईक, आजऱ्याच्या सरपंच नयन भुसारी, रमेश रेडेकर, सरपंच प्रकाश कांबळे, अरुण देसाई, राजू होलम उपस्थित होते. (प्रतिनिधी)