शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री प्रचारासाठी आजपासून मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:31 IST

कोल्हापूर : चंद्रकांत पाटील कोणाचा प्रचार करणार अशा बातम्या वृत्तपत्रांतून येत आहेत; त्यामुळे कार्यकर्त्यांसह लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे; परंतु ...

कोल्हापूर : चंद्रकांत पाटील कोणाचा प्रचार करणार अशा बातम्या वृत्तपत्रांतून येत आहेत; त्यामुळे कार्यकर्त्यांसह लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे; परंतु आता युती झाल्याने कोणीही शंका बाळगायची गरज नाही. आज, सोमवारी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांच्या मुरगूड येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण मैदानात उतरून प्रचाराला सुरुवात करणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केले.शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण उद्घाटन समारंभात ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती महापौर सरिता मोरे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार राजेश क्षीरसागर, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, नगरसेविका तेजस्विनी इंगवले, नगरसेवक अजित ठाणेकर, माजी नगरसेवक अजित राऊत, सुनील मोदी, माजी महापौर बाजीराव चव्हाण आदींची होती. पालकमंत्र्यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले.मंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूरसह हातकणंगले, सातारा, सांगली, माढा, सोलापूर अशा एकापाठोपाठ युतीच्या जागा जिंकूनच दाखवू. मी मैदानात उतरल्यावर काय होते हे विरोधकांना माहीत आहे. शिवसेना-भाजपच्या युतीमध्ये मध्यंतरीच्या काळात झालेल्या घडामोडींवरून विरोधकांना आम्ही एकत्र येणार नाही असे वाटत होते. ते त्यांच्या आघाडीच्या बैठका जाहीरपणे घेत होते; परंतु आमच्या बैठका कुठे सुरू होत्या याची त्यांना कल्पना नव्हती. आता युती झाल्याने आम्ही एकत्रच राहणार असून, कोणीही शंका बाळगू नये.अरुण दुधवडकर म्हणाले, नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही जागांसह राज्यातील सर्व जागा जिंकण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ती प्रामाणिकपणे पार पाडू.आमदार क्षीरसागर म्हणाले, शहरातील पुतळ्यांच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले असून, ते लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. महापौर सरिता मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. रविकिरण इंगवले यांनी प्रास्ताविक केले. अंकुश निपाणीकर यांनी सूत्रसंचालन केले.गांधी मैदानासाठी ९० लाखांचा निधी मंजूरगांधी मैदानाच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची मागणी रविकिरण इंगवले यांनी केली होती. त्यानुसार ९० लाखांचा निधी यासाठी मंजूर केला असून, हा एक टप्पा आहे.हा निधी पुरेसा नसून या कामासाठी दोन ते अडीच कोटी खर्च येणार असून उर्वरित निधी पुढील टप्प्यात देण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली....तर शिवसेना-भाजपचा महापौर होईलयुती झाल्यानंतर दोन्ही पक्षांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येण्याचा योग आला आहे. राज्यात युती झाली आहे; त्यामुळे आता महापालिकेतही युती होणे गरजेचे आहे.दोघांनी एकत्र येऊन महापालिकेची निवडणूक लढविल्यास शिवसेना-भाजपचाच महापौर होईल व विविध प्रकल्प राबविता येतील, असा विश्वास रविकिरण इंगवले यांनी व्यक्त केला.