शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

क्षमतेचा वापर करून लौकिक वाढवा

By admin | Updated: February 4, 2015 23:58 IST

कुलगुरूंचे आवाहन : खेळाडू, प्रशिक्षक, संघव्यवस्थापकांचा गौरव

कोल्हापूर : ग्रामीण भागातील विद्यार्थी, खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्याचा त्यांनी योग्य पद्धतीने वापर करावा. त्याद्वारे शिवाजी विद्यापीठाचा लौकिक वाढवावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी बुधवारी केले.शिवाजी विद्यापीठ क्रीडा विभागातर्फे शैक्षणिक वर्ष २०१२-१३ मधील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत यश मिळविणाऱ्या खेळाडूंचा गुणगौरव, आयोजित खेळाडूंच्या गौरव समारंभात ते बोलत होते. विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषा भवनातील कार्यक्रमास ‘बीसीयुडी’ संचालक डॉ. अर्जुन राजगे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, डॉ. डी. आर. मोरे, डॉ. शरद हुन्सवाडकर, विद्यार्थी कल्याण मंडळाचा अध्यक्ष पंकज मोरे प्रमुख उपस्थित होते.कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, विद्यापीठाला ‘नॅक’चे ‘अ’ मानांकन मिळविण्यात क्रीडा अधिविभागाचे देखील महत्त्वाचे योगदान आहे. ते लक्षात घेता या विभागाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. जास्तीत जास्त क्रीडापटूंना योग्य संधी देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील राहील.कार्यक्रमात कुलगुरू डॉ. पवार यांच्या हस्ते विभागीय, आंतरविभागीय स्पर्धेमध्ये यश मिळविलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. तसेच अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य व सर्वाधिक गुण संपादन केल्याबदल छत्रपती शहाजी महाविद्यालयास सन २०१२-१३ मधील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा. शांताराम माळी, बाबासाहेब उलपे यांची भाषणे झाली.‘सिंथेटिक ट्रॅक’ पूर्ण करणारविद्यापीठातील सिंथेटिक ट्रॅकमधील गोळाफेक, भालाफेक, आदींबाबतचे काम अपूर्ण राहिले आहे. त्यासाठी आवश्यक त्या निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात केली जाईल. विद्यापीठातून जाण्यापूर्वी ट्रॅकचे काम पूर्ण करणार असल्याची ग्वाही कुलगुरू डॉ. पवार यांनी यावेळी दिली.क्रीडा विभागप्रमुख पी. टी. गायकवाड यांनी स्वागत केले. क्रीडा प्रशिक्षक जे. एच. इंगळे यांनी गौरवपत्राचे वाचन केले. प्रा. दीपक डांगे-पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)खेळाडूंचा गौरव...प्रेम पोटाबत्ती (सांगली), अपर्णा मगदूम, सुविचार परमाजे, अजिंक्य रेडेकर, (इचलकरंजी), प्रियांका मोरे, केतकी नावले (सातारा), सूरज खेबुडकर (वाई, सातारा), फुलचंद बांगर (कोल्हापूर), सुमित चव्हाण (वारणानगर), महमंदरूसुल अब्बास मुल्ला, ऋतुराज जाधव, अमित निंबाळकर, उत्तम मेंगाणे, विश्वजित तोरसे, (कोल्हापूर), महेश वरुटे (तिसंगी, गगनबावडा) या खेळाडूंसह राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खो-खो (मुले-मुली), कबड्डी, बास्केटबॉल आणि फुटबॉल (मुले) संघांचा सत्कार करण्यात आला.