शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

गडहिंग्लज शालेय फुटबॉल संंघाच्या गटांगळ्याच

By admin | Updated: August 29, 2014 23:40 IST

जिल्हास्तरीय स्पर्धा : सराव, प्रशिक्षकांच्या अभावाचा परिणाम

गडहिंग्लज : शासनाच्या क्रीडा विभागातर्फे झालेल्या फुटबॉल स्पर्धेत स्थानिक शालेय संघांनी गटांगळ्या खाल्ल्याने निराशाजनक कामगिरी नोंदविली गेली. खुल्या गटात ‘प्रतिभावंत फुटबॉलपटूंची खाण’ अशी ओळख असणाऱ्या गडहिंग्लजचे शालेय स्तरावरील हे अपयश वेदनादायक आहे. सराव आणि प्रशिक्षणाचा अभाव हेच अपयशाचे प्रमुख कारण आहे.जिल्ह्यात कोल्हापूर शहरानंतर मोठ्या प्रमाणात गडहिंग्लजला फुटबॉल खेळला जातो. लोकवर्गणीतून दीपावलीच्या सुटीत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसह अलीकडे विविध व्यावसायिक संघांत स्थानिक खेळाडूंनी स्थान मिळविले आहे. ‘प्रतिभावंत फुटबॉलपटूंची खाण’ अशी नवी ओळख गडहिंग्लजने निर्माण केली आहे. साहजिकच अलीकडे नवोदित फुटबॉलपटूंच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.कोल्हापुरात झालेल्या १४, १७ व १९ वर्षांखालील स्पर्धेत स्थानिक संघ सहभागी झाले. यामध्ये गडहिंंग्लज हायस्कूल, साधना, जागृती, वि. दि. शिंदे, गिजवणे हायस्कूल व संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालय संघांचा समावेश होता. काहींनी उपांत्यपूर्व वाटचाल केली. मात्र, कोणालाही अंतिम फेरीपर्यंत पोहोचता आले नाही. बहुतांश संघ टायब्रेकरमध्ये कमनशिबी ठरले. वस्तुत: कोल्हापूर महानगरपालिकेचा विभाग वेगळा केल्याने गडहिंग्लज संघांना आव्हान देणारे कोल्हापूरचे संघ बाजूला असतानाही मिळणारे अपयश हा चिंतेचा विषय आहे.गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने शालेय स्तरावर सातत्याने विविध स्पर्धांद्वारे संधी दिल्याने नवोदित खेळाडूंची संख्या वाढली आहे. सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात सर्वच मैदानांवर सरावासाठी शालेय खेळाडूंची गर्दी असते. मात्र, कोणत्याच संघाला प्रशिक्षक नसल्याने विद्यार्थीच आपल्या कुवतीनुसार सराव करतात.क्रीडाशिक्षकांवर सर्वच क्रीडाप्रकारांची जबाबदारी असल्याने ते सगळीकडे आहेत आणि कोठेच नाहीत, अशी अवस्था आहे. त्यामुळे जाहिरातींसाठी वारेमाप खर्च करणाऱ्या शिक्षणसंस्थांनी अर्धवेळ मानधन तत्त्वावर फुटबॉल प्रशिक्षक नेमण्याची मागणी पालकांची आहे. खेळण्याची आवड व मेहनतीची तयारी असूनही केवळ मार्गदर्शनाअभावी यश मिळत नसल्याचे खेळाडूंचे मत आहे. (प्रतिनिधी)फुटबॉलपटूंची फरफटशासकीय स्पर्धांतील सहभागासाठी खेळाडू घरचे जेवणाचे डबे घेऊन, प्रवासखर्चासाठी पदरमोड करून सहभागी होतात. वास्तविक राज्य परिवहन मंडळातर्फे खेळाडूंना प्रवासात ७५ टक्के सवलत असतानाही त्याची माहिती संघव्यवस्थापकांना नाही.