कोल्हापूर : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती रविवारी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटनांच्यावतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले.
परिवर्तन संघटना
बिंदू चौकात परिवर्तन संघटनेतर्फे ॲड. धनंजय पठाडे यांच्याहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमोल कुरणे, पृथ्वीराज पठाडे, वि. स. खांडेकर प्रशालेचे ग्रंथपाल पी. डी. धनवडे, महेश पाटोळे, मनीषा घुणकीकर, अक्षय साळवे, अमर जाधव उपस्थित होते.
--
फोटो नं ०३०१२०२१-कोल-परिवर्तन संघटना
ओळ : बिंदू चौकात परिवर्तन संघटनेतर्फे ॲड. धनंजय पठाडे यांच्याहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारती विद्यापीठ इंग्लिश मिडीयम स्कूल
शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मिला शिंदे यांच्याहस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन झाले. यानिमित्त ऑनलाईन निबंध स्पर्धा, काव्यवाचन व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत अश्नी पाटील, विनया विधाते, मधुरा पाटील, सादिया शेख, कविता पुजारी, मंथन समुद्रे या विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकावले. रावसाहेब पाटील, माधुरी जगताप, सरोजिनी चावरे यांनी संयोजन केले.
बालकल्याण संकुल
संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. स्नेहल बडवे व हर्षदा बागडे यांनी प्रास्ताविक केले. अमृता जाधव हिने ‘मी सावित्री बोलते’ हा एकपात्री कार्यक्रम सादर केला. सोनाली नुलकर, संजना कवडे, दिया हलवाई, स्वरांजली खरे यांनी मनोगत व्यक्त केले. सुरेश शिपूरकर यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या त्यागाची व जीवनकार्याची माहिती दिली. यावेळी अधीक्षक अश्विनी गुजर, पी. के. डवरी, द्रौपदी पाटील, नजिरा नदाफ, राजश्री डवरी, शरयू मोरे, धनश्री जाधव उपस्थित होत्या.
अखिल भारत हिंदू महासभा
संस्थेच्यावतीने सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. महिला आघाडी अध्यक्षा रेखा दुधाणे व मंगला भाट्ये यांनषी प्रतिमा पूजन केले. जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप यांनी मनोगत व्यक्त केले. नंदू घोरपडे यांनी आभार मानले. यावेळी महिला राज्याध्यक्षा दीपाली खाडे, अलका देवलापूरकर, नंदकुमार घोरपडे, संजय कुलकर्णी, बंडा साळोखे, अवधूत भाट्ये, अजय सोनवणे उपस्थित होते.
सरस्वती चुनेकर विद्या मंदिर
मुख्याध्यापिका पूजा आपटे यांनी प्रतिमापूजन केले. शिक्षक शंकर गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
जय भारत हायस्कूल
संस्थेच्या उपाध्यक्षा सुमित्रा जाधव यांनी प्रतिमा पूजन केले. त्यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाईंच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. बी. जी. माणगावे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी निबंध स्पर्धा व पुस्तक वाचन उपक्रम घेण्यात आला. अरुण कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. एम. वाय. निकाडे यांनी आभार मानले.
गर्ल्स हायस्कूल
प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊस संचलित गर्ल्स हायस्कूलमध्ये एस. ए. जाधव व मुख्याध्यापिका एच. एच. गोसावी यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन झाले. साक्षी पाटील, श्रेया चव्हाण, समृद्धी संकपाळ, अल्झरीन बांगी, अंजली शिरतोडे, समृद्धी वागरे, सोनल वडणगेकर या विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंचा संघर्ष आपल्या भाषणातून मांडला. डॉ. व्ही. के. पाटील, व्ही. यु. नागरगोजे यांनी पुस्तक वाचनाचे महत्त्व सांगितले. एस. ए. जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यु. एस. देसाई यांनी आभार मानले.
माजी खासदार एस. के. डिगे मेमोरियल फौंडेशन
प्रणिता डिगे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. फौंडेशनचे अध्यक्ष सदानंद डिगे यांनी सावित्रीबाईंनी शिक्षणाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती दिली. यावेळी योगेश डिगे, ज्योती कांबळे, दीपा कांबळे,. विकी माजगावकर, कैलास शिंगे, पुष्पा कांबळे, रेखा नाईक यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महाराष्ट्र हायस्कूल
ज्येष्ठ शिक्षिका ए. आर. भोसले व एस. आर. पाटील यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. आर. आर. पाटील यांनी सावित्रीबाईंच्या कार्याची माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक ए. एस. रामाणे, उपप्राचार्य यु. आर. आतकिरे, यु. एम. पाटील, के. ए. ढगे उपस्थित होते.
आधार फौंडेशन
सामाजिक कार्यकर्ते चंद्राप्पा खाने यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. फौंडेशनचे अध्यक्ष संजय गुदगे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशांत वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. सागर गोंधळे यांनी आभार मानले. यावेळी आकाश पट्टण, अजित यतनाळ, राहुल कांबळे, किरण कळीमनी आदी उपस्थित होते.
---