शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

शाहू जन्मस्थळी राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2017 13:39 IST

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

लोकमत आॅनलाईन

कोल्हापूर, दि. २६ : राजर्षी शाहू महाराज यांच्या १४३ व्या जयंती निमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट देवून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती, कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, महापौर हसिना फरास, आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी, अप्पर पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत आर. एस. पाटील, जेष्ठ विचारवंत डॉ.जयसिंगराव पवार, डॉ. रमेश जाधव, वसंतराव मुळीक, इतिहास तज्ज्ञ इंद्रजित सावंत, स्थायी समितीचे सभापती संदीप नेजदार, संदीप देसाई यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शाहु जन्मस्थळाचे काम उत्कृष्ट झाले असून या ठिकाणी जागतीक किर्तीचे संग्रहालय व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलाला १३ कोटीचा निधी निश्चितपणे उपलब्ध करुन दिला जाईल. त्यासाठीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून त्याच्या पहिल्या टप्प्यात दोन कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असून निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली असून कामालाही लवकरच सुरुवात होईल. जसजसी कामे पुर्ण होत जातील तसतसे निधी उपलब्ध करुन दिले जातील. यासंदर्भात दि. २८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येऊन कामासंदर्भात झालेली पुर्व तयारी व पुढील कामांची आवश्यकता यांचा आढावा घेण्यात येईल.

दसरा चौकातही जयजयकार

दरम्यान ऐतिहासिक दसरा चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळयाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी आमदार सतेज पाटील ,कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांच्यासह अन्य मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सामाजिक न्याय विभागातर्फे समाता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये शाहू महाराजांची वेषभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. झांज पथक, लेझीम पथक, शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित लक्षवेधी चित्ररथासह शाहू महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.