लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांना स्मृती दिनानिमित्त आज शनिवारी सकाळी सव्वादहा वाजता अभिवादन करण्यात येणार आहे. लक्ष्मीपुरी येथील पोलीस वसाहतीमध्ये हा कार्यक्रम होणार असून, निर्धार प्रतिष्ठान आणि अक्षर दालनातर्फे आयोजन केले आहे.
महापालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण आणि जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात येणार आहे. सावंत यांनी ही लोकप्रिय कादंबरी लक्ष्मीपुरी येथील पोलीस वसाहतीमधील १२ क्रमांकाच्या खोलीमध्ये वास्तव्यास असताना लिहिली. या ठिकाणी येत्या दोन महिन्यांत जुनी घरे पाडण्यात येणार असून, पोलिसांसाठी नवा गृहप्रकल्प उभारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर याच खोलीमध्ये प्रतिमापूजन करण्यात येणार आहे.