शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शहिदांना अभिवादन, कोविड योद्ध्यांना सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:21 IST

कोल्हापूर : ‘श्रद्धादीप’ प्रज्वलन, देशभक्तिपर गीते, ‘मशाल रॅली’ अशा भावपूर्ण वातावरणात कोल्हापूरकरांनी शुक्रवारी शहिदांच्या स्मृतींना अभिवादन केले, ...

कोल्हापूर : ‘श्रद्धादीप’ प्रज्वलन, देशभक्तिपर गीते, ‘मशाल रॅली’ अशा भावपूर्ण वातावरणात कोल्हापूरकरांनी शुक्रवारी शहिदांच्या स्मृतींना अभिवादन केले, तर कोविड योद्ध्यांना सलाम केला.

वीर जवान अभिजित सूर्यवंशी यांचा २० वा स्मृतिदिन आणि जीवनमुक्ती सेवा संस्थेचा (व्हाईट आर्मी) २१व्या वर्धापनदिनानिमित्त ‘शहीद दिन’ कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात प्रारंभी वीर जवान अभिजित सूर्यवंशी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सायंकाळी सातच्या सुमारास ॲड. धनंजय पठाडे, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव, शाहीर राजू राऊत, व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मशाल रॅली’चा प्रारंभ झाला. बिंदू चौक, शिवाजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे रॅली पुन्हा बिंदू चौकात आली. त्यानंतर विद्यार्थी, नागरिकांच्या हस्ते दीड हजार श्रद्धादीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. पोलीस, डॉक्टर, सफाई कामगार, आदी कोविड योद्ध्यांना सलाम करण्यात आला. विनायक भाट, सुमित साबळे, प्रेम सातपुते, हिना यादवाड, डॉ. हर्षवर्धन जगताप, सिद्धेश पाटील, प्रशांत शेंडे, आदी कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जयेश ओसवाल, हर्षेल सुर्वे, शाहीर दिलीप सावंत, ऐश्वर्या मुनीश्वर, प्रकाश गाताडे, डॉ. अंजना जाधव, अरविंद देशपांडे, अजित सातपुते, विजया रोकडे, कस्तुरी, राजेश्वरी आणि शर्वरी रोकडे, चंद्रहार पाटील, डॉ. शीतल पाटील, बंडा साळोखे, आदी उपस्थित होते. प्रकाश सुतार यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट

‘कोविड योद्धा’ संदेश

या कार्यक्रमात ‘श्रद्धादीप’ प्रज्वलित करून ‘कोविड योद्धा’ असा संदेश देण्यात आला. शाहीर राजू राऊत यांनी ऐतिहासिक बिंदू चौकाच्या तटबंदीची महती सांगितली. राजेंद्र कोरे, सागर मौर्य, अमरसिंह संघर्षे यांनी सादर केलेल्या ‘कर चले हम फिदा’, ‘मेरा कर्मा तू...’, ‘भारत हमको जानसे प्यारा है’, आदी देशभक्तिपर गीतांनी परिसर दुमदुमला.

फोटो (२५१२२०२०-कोल-व्हाईट आर्मी फोटो) : कोल्हापुरात शुक्रवारी व्हाईट आर्मीतर्फे आयोजित शहीद दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांनी ‘श्रद्धादीप’ प्रज्वलित करून ‘कोविड योद्धा’ असा संदेश दिला. (छाया : आदित्य वेल्हाळ)