शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जल्लोषाऐवजी हुतात्म्यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:39 IST

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे स्वागत करून या यशाबद्दल सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी स्वर्गीय आण्णासाहेब पाटील यांच्यासह ...

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे स्वागत करून या यशाबद्दल सकल मराठा समाजातर्फे गुरुवारी स्वर्गीय आण्णासाहेब पाटील यांच्यासह मराठा आंदोलनात आत्मबलिदान करणाऱ्या ४२ हुतात्म्यांना दसरा चौकात अभिवादन करण्यात आले. सायंकाळी पणत्या प्रज्वलित करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला, तर दोन दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर झाल्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले सचिन तोडकर व मनीष महागावकर यांचे उपोषण मागे घेण्यात आले. शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन हे उपोषण सोडण्यात आले. यावेळी प्रा. जयंत पाटील, जयेश कदम, बाबा पार्टे, अ‍ॅड. शिवाजीराव राणे, नगरसेवक मुरलीधर जाधव, शारंगधर देशमुख, स्वप्निल पार्टे, अनिल कदम, अजित राऊत, दिलीप सावंत, विनायक फाळके आदी उपस्थित होते.यानंतर दसरा चौकात एकत्रितपणे आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत केले; परंतु जल्लोष न करता मराठा महासंघाचे संस्थापक स्वर्गीय आण्णासाहेब पाटील, कोपर्डी घटनेतील ताई व मराठा आंदोलनातील ४२ हुतात्म्यांना अभिवादन केले. तसेच सायंकाळी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर पणत्या प्रज्वलित करून हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, अवधूत पाटील, जयेश कदम, कमलाकर जगदाळे, अनिल कदम, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, महादेव पाटील, दुर्गेश लिंग्रस उपस्थित होते.इंद्रजित सावंत म्हणाले, आरक्षणाचा हा निर्णय स्वागतार्ह असून आंदोलकांचा ५० टक्के विजय आहे. ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षण देण्याची मागणी होती.वसंतराव मुळीक म्हणाले, सरकारने हौतात्म्य पत्करलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदतीचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता लवकरात लवकर करावी.