गडहिंग्लज शहर व तालुक्यात लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची १४७ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. कोरोनाचे निर्बंध पाळत प्रतिमापूजन, वृक्षारोपण आदी उपक्रम पार पडले.
शिवसेना शाखा, हसूरचंपू
हसूरचंपू येथील शिवसेना शाखेतर्फे प्रा. सुनील शिंत्रे यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी शाखाप्रमुख मारुती कमते, उपशहरप्रमुख काशीनाथ गडकरी, अवधूत पाटील, तेजस घेवडे, राजू भोईटे, संभाजी येरुडकर, चंद्रकांत खवणे, लक्ष्मण गोटुरे, जोतिबा बिरंजे, शकील मुल्ला उपस्थित होते.
यशोदाबाई घोरपडे हायस्कूल, हसूरचंपू
हसूरचंपू येथील यशोदाबाई घोरपडे हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक ए. एस. पाटील, टी. एस. सुतार यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी एस. एस. घस्ती, एस. एम. मिश्रीकोटी, एन. ए. गायकवाड, बी. व्ही. कुट्रे, एस. एम. कोळी, एम. आय. रॉड्रिक्स, व्ही. एम. पाटील आदी उपस्थित होते.
गडहिंग्लज हायस्कूल, गडहिंग्लज
शहरातील गडहिंग्लज हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक एस. एन. देसाई यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. एम. एस. शिंदे, व्ही. आर. पालेकर, पी. टी. पाटील, एम. एस. शिंदे, पी. एस. पाटील, सी. एस. कुंभार आदी उपस्थित होते.
ओंकार महाविद्यालय, गडहिंग्लज.
शहरातील ओंकार महाविद्यालयात ज्येष्ठ संचालक गजानन गिजवणेकर यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. प्र. प्राचार्य सुरेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शर्मिला घाटगे, अनिल पाटील, काशिनाथ तनंगे, सुभाष कांबळे आदी उपस्थित होते.
'शिवराज' महाविद्यालय, गडहिंग्लज.
गडहिंग्लज शिवराज महाविद्यालयात संस्थाध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले.
प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी स्वागत केले. यावेळी सचिव अनिल कुराडे, संतोष शहापूरकर आदी उपस्थित होते.
'झेप अॅकॅडमी' गडहिंग्लज
येथील झेप अॅकॅडमीतर्फे आयोजित कार्यक्रमात प्रा. दत्ता पाटील, रेखा पोतदार यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी प्राचार्य आर. एस. निळपणकर, महेश मजती, विजय आरबोळे, डी. के. मायदेव, शिवानंद घुगरे, बाबासाहेब मार्तंड, सागर माने आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादनप्रसंगी सिद्धार्थ बन्ने, साताप्पा कांबळे, गणपतराव पाटोळे, प्रकाश कांबळे, शशिकांत पुजारी, सुभाष पाटील, अशोक मोहिते आदी उपस्थित होते.
क्रमांक : २७०६२०२१-गड-०६