शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमोर नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोरोना संसर्ग, लॉकडाऊन, सोशल डिस्टन्स या सर्वांना मागे सारत बुधवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी ...

कोल्हापूर : कोरोना संसर्ग, लॉकडाऊन, सोशल डिस्टन्स या सर्वांना मागे सारत बुधवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती जिल्ह्यात धुमधडाक्यात आणि जल्लोषात साजरी झाली. शोभायात्रा, मिरवणुका, जाहीर व्याख्यानांना फाटा दिला असला तरी पुतळ्याला पुष्पमालांनी अभिवादन करण्यासाठी रीघ लागल्याचे सार्वत्रिक चित्र होते. गुढ्या उभारुन, पुष्पांची उधळण करत जल्लोष साजरा केला गेला.

बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत साकारलेल्या अर्ध पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांची रीघ लागली होती. तेथील मध्यप्रदेशातील महू या गावातील आंबेडकरांचे जन्मस्थळ असलेल्या घराची प्रतिकृती ही लक्ष वेधून घेत होती. पुतळ्याच्या भोवती आकर्षक सजावटही करण्यात आली होती. आंबेडकरी अनुयायांनी या घरासह पुतळ्यासमोर नतमस्तक होत महामानव बाबासाहेबांच्या नावाचा जयजयकार केला. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी महापौर निलोफर आजरेकर, अशोक जाधव, प्रा. शरद गायकवाड, शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, उत्तम कांबळे, सदानंद डिगे, डी.जी.भास्कर, विश्वास देशमुख, रुपाली वायदंडे, संजय जिरगे, सुभाष देसाई यांनी अभिवादन केले. विविध आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बिंदू चौकात गर्दी केली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयंती सार्वजनिकरीत्या साजरी करु नये, साधेपणाने घरात राहूनच करावी असे निर्देश शासकीय पातळीवर देण्यात आले होते. पण प्रत्यक्षात जयंतीच्या उत्साहासमोर सर्व नियम फिके पडले. गावागावात, गल्लोगल्ली, चौकाचौकात फोटो पूजनासह अभिवादनाचा कार्यक्रम जल्लोषात करण्यात आले.

पीपल्स रिपब्लिकन पार्टी : जिल्हाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे अशासकीय सदस्य डी. जी. भास्कर यांच्या हस्ते बिंदू चौकातील पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. करवीर तालुकाध्यक्ष रमेश पाचगावकर, विलास भास्कर, जगन्नाथ कांबळे, प्रकाश संघमित्र, प्रकाश सातपुते, बाजीराव गायकवाड, तकदीर कांबळे उपस्थित होते.

जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघ : खादी ग्रामोद्योग संघ, सर्वोदय मंडळ, स्वातंत्र्यसैनिक वारस संघटना, समता हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेडकर यांची जयंती साजरी झाली. सुंदरराव देसाई यांनी फोटो पूजन केले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्राचार्य व्ही.डी.माने, दादासाहेब जगताप, सुजय देसाई, सदाशिव मनुगडे, एस.एस.सावंत, विष्णुपंत अंबपकर, पी.के.पटील, आर.डी.पाटील, सविता देसाई, छाया भोसले प्रमुख उपस्थित हाेते.

बौद्ध अवशेष विचार संवर्धन समिती : संस्थेचे अध्यक्ष टी. एस. कांबळे , कार्याध्यक्ष बापूसाहेब कांबळे यांनी रात्री १२ वाजता सालाबादप्रमाणे बिंदू चौकातील पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी सर्जेराव थोरात, विपुल वाडीकर, अजित कांबळे, अर्जुन कांबळे, संजय माळी यांनी सहभाग घेतला. यावेळी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना आंबेडकर यांच्या कार्याची महती सांगणारे कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात आले.

फोटो: १४०४२०२१-कोल- आंबेडकर जयंती ०१

फोटो ओळ : कोल्हापुरात बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी बिंदू चौकातील पुतळ्याला पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी महापौर निलोफर आजरेकर, सुभाष देसाई, शहाजी कांबळे, सदानंद डिगे, उत्तम कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.