शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चळवळ पुढे नेणे हीच ‘एनडीं’ना कृतज्ञता: पन्नालाल सुराणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:10 IST

कोल्हापूर : आम्ही चळवळीतील शेवटची पिढी आहे, असे ऐकणे बरे वाटत नाही. चळवळ टिकली पाहिजे, ती वाढली पाहिजे. तरुणाईसह महिलांनी निर्धारपूर्वक चळवळीत सहभागी होऊन ती पुढे नेणे हीच ‘एन. डी.’ यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासारखे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा यांनी बुधवारी येथे केले.ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. ...

कोल्हापूर : आम्ही चळवळीतील शेवटची पिढी आहे, असे ऐकणे बरे वाटत नाही. चळवळ टिकली पाहिजे, ती वाढली पाहिजे. तरुणाईसह महिलांनी निर्धारपूर्वक चळवळीत सहभागी होऊन ती पुढे नेणे हीच ‘एन. डी.’ यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासारखे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा यांनी बुधवारी येथे केले.ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी ९० व्या वर्षात पर्दापण केल्याबद्दल राज्य आणि कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनतर्फे आयोजित ‘कृतज्ञता सोहळा’ मध्ये ते बोलत होते. येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमधील कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत प्रा. पाटील यांचा सत्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुराणा यांच्या हस्ते मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन केले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. सुजित मिणचेकर प्रमुख उपस्थित होते. सुराणा म्हणाले, शेतकरी आणि गरिबांच्या विविध प्रश्नांसाठी प्रा. पाटील यांनी अहिंसेच्या मार्गाने लढे दिले. त्यात यश मिळविले. ‘विचारवेध’, अंनिसच्या कार्याला बळ दिले. अनेक लढ्यात त्यांच्याबरोबर मला काम करता आले. त्यातून खूप काही शिकता आले. ‘एन. डी.’ यांचा समतेचा आग्रह आपण मनी बाळगणे, व्यवहारात आणणे आवश्यक आहे.