शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ परिसराचे दिनदर्शिकेतून चित्रमय दर्शन

By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST

कुलगुरूंनी केले प्रकाशन : विद्यापीठाच्या इतिहासातील पहिलीच दिनदर्शिका

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात यावर्षी पहिल्यांदाच दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे. त्यातून विद्यापीठ परिसराचे चित्रमय दर्शन घडणार आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी दिनदर्शिका आणि सन २०१६ च्या दैनंदिनीचे प्रकाशन झाले.कार्यक्रमात या दैनंदिनीच्या निर्मितीत महत्त्वाचा सहभाग असणारे छायाचित्रकार शिरीष गवळी, जनसंपर्क कक्षाचे सेवक राघवेंद्र येसणे व आर्टिस्ट विशाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर आदी उपस्थित होते. दरम्यान, या दिनदर्शिकेत विद्यापीठाची मुख्य प्रशासकीय इमारत, दूर शिक्षण केंद्र, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय, स्कूल आॅफ नॅनो सायन्स व तंत्रज्ञान, परीक्षा भवन, तंत्रज्ञान विभाग यांच्या इमारतींसह छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार, वि. स. खांडेकर यांच्या पुतळ्यांच्या छायाचित्रांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या मुद्रणालयातच छपाई केली आहे. दिनदशिर्केच्या प्रथम पृष्ठावर कुलगुरू डॉ. शिंदे यांचा शुभसंदेश असून दर महिन्यात विद्यापीठाचे वैशिष्ट्य असणाऱ्या ‘नो व्हेईकल डे’सह विद्यापीठाच्या सर्व सार्वजनिक सुट्ट्यांची माहिती वेगळ्या रंगसंगतीद्वारे दर्शविली आहे. (प्रतिनिधी)