शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

दादा, ‘उत्तर’पेक्षा,‘पदवीधर’चे बघा

By admin | Updated: October 12, 2015 00:26 IST

राजेश क्षीरसागर यांचा पलटवार : चिन्ह नसलेल्यांशी आघाडीची ‘भाजप’वर वेळ

कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘उत्तर विधानसभा मतदारसंघ’ टार्गेट करण्यापेक्षा त्यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाची पहिल्यांदा जास्त काळजी करावी. कारण गेल्या निवडणुकीत निवडून येताना ते घामाघूम झाले होते. आणि विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनाही त्यांच्या विरोधात उतरणार आहे. त्यामुळे दादांनी आपल्या आमदारकीचे बघावे, असा पलटवार आमदार राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना केला. चिन्ह नसलेल्या आघाडीशी युती करण्याची केविलवाणी वेळ भाजपवर आल्याची टीका करीत शिवसेना स्वाभिमानाने सर्वच्या सर्व ८१ जागा लढवीत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढण्याचे टार्गेट नाही; पण ‘उत्तर’ टार्गेट असल्याची टीका मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली होती. त्यास प्रत्युत्तर देताना आमदार क्षीरसागर म्हणाले, भाजप थेट विरोधात असताना आपल्या मताधिक्यात पाचपटींनी वाढ झाली. याउलट गतनिवडणुकीत चंद्रकांतदादा मात्र अवघ्या २३०० मतांनी कसेबसे विजयी झाले. मागील सहा विधानसभा निवडणुकांपैकी पाचवेळा कोल्हापूरची जनता शिवसेनेच्या पाठीशी राहिली आहे. त्यामुळे दादांचे ‘उत्तर’ जिंकण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहील.’ शिवसेनेने पत्रकबाजी केल्याने महापालिकेसाठी युती केली नसल्याचा आरोप मंत्री पाटील करीत आहेत; पण वस्तुस्थिती तशी नाही. भाजपने ‘प्रिप्लॅनिंग’ करून युती तोडली आहे. ती तोडायची होती म्हणूनच त्यांनी कोल्हापुरात पक्षाचे अधिवेशन घेतले? त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला ‘ताकद’ दाखविण्याची भाषा वापरली. सुरुवात त्यांनी केल्याने आम्ही ‘भगव्या सप्ताहा’ने त्यास उत्तर दिले. कोल्हापूरची स्वाभिमानी जनता महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला त्यांची खरी जागा दाखवेल, असा इशाराही आमदार क्षीरसागर यांनी दिला. शिवसेनेतील काही चौकडी निष्ठावंत असल्याचे सांगत पक्षाला बदनाम करीत आहे; पण उमेदवारी देताना पक्षनिष्ठा पाहूनच उमेदवारी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.