शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

श्रवणबेळगोळला निघाली भव्य मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 05:24 IST

जगभरातील जैन बांधवांचे श्रद्धास्थान असणा-या श्रवणबेळगोळ ( कर्नाटक) येथील गोमटेश्वर भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवानिमित्त सोमवारी सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली.

कोल्हापूर: जगभरातील जैन बांधवांचे श्रद्धास्थान असणा-या श्रवणबेळगोळ ( कर्नाटक) येथील गोमटेश्वर भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवानिमित्त सोमवारी सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात देशभरातून आलेले श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीत २०० तुतारी, १०८ ढोल, १०८ बँड, १०८ घंटा, १०८ शंख, १०८ ध्वज यासह विशेष वाद्यवृंदांचा समावेश होता.बुधवार (दि. ७) पासून पंचकल्याणक विधींनी महामस्तकाभिषेकच्या महोत्सवाचा प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर श्रवणबेळगोळ येथे सोमवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीबरोबरच नादीमंगल पूजेचेही आयोजन केले होते. यावेळी श्रवणबेळगोळजवळच्या सर्व जैन मंदिरांतील तीर्थंकराच्या मूर्तींवर जल, गंध, केशर, पुष्प यांनी विशेष अभिषेक करण्यात आला. पूजेवेळी विविध मान्यवरांच्या हस्ते चतुर्विध दान म्हणजेच शास्त्र, अभय, वस्त्र व आहार दान करण्यात आले.आचार्य वंदना हा कार्यक्रमही पार पडला. देशभरातून आलेल्या शेकडो मुनी, भगवंतांना महोत्सव समितीचे पदाधिकारी, श्रावक यांनी वंदन केले आणि आशीर्वाद घेतले. दुपारी आचार्य निमंत्रणानंतर आचार्य वर्धमानसागर, आचार्य देवनंदी, आचार्य पुष्पदंतसागर महाराज व अन्य त्यागी गण मिरवणुकीसह पंचकल्याण पूजा होत असलेल्या संस्कार हॉल या ठिकाणी गेले. या ठिकाणी त्यागींच्या उपस्थितीत काही धार्मिक विधी करण्यात आले. दरम्यान, देशभरातून आलेल्या भाविकांना चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी कोल्हापूर, सांगली, बेळगाव येथील वीर सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी स्वयंसेवक नगरमध्ये तात्पुरते हॉस्पिटल सुरू केले आहे.>अभिषेकासाठीदहा प्रकारचे कलशया महामस्तकाभिषेकासाठी नवरत्न, रत्न, स्वर्ण, दिव्य, रजत, ताम्र, कांस्य, शुभमंगल, मंगल, गुल्लकाजी अशा दहा प्रकारच्या कलशांनी महामूर्तीवर अभिषेक होणार आहे. यामध्ये या कलशप्रकारांचा समावेश आहे.>१७ भोजनशाळाश्रवणबेळगोळ येथे एकूण १७ भोजनशाळा उभारण्यात आल्या आहेत. मुख्य मंडपामध्ये एकावेळी चाळीस हजार लोक बसतील अशी भव्य बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.