रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या सेवाअंतर्गत परीक्षेपूर्वी परीक्षा केंद्रावर सडामिऱ्याचे ग्रामसेवक उद्धव गीते यांची महिला कर्मचाऱ्याने चपलेने धुलाई केली़ ज्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सेवा दोन ते पाच वर्षांपर्यंत झाली आहे, अशा कर्मचाऱ्यांची आयुक्त कार्यालयाकडून सेवाअंतर्गत परीक्षा झाली़ या परीक्षेसाठी कर्मचाऱ्यांचे शनिवारी आणि आज रविवारी दोन असे तीन पेपर घेण्यात आले़ अजिजा दाऊद नाईक हायस्कूलमध्ये हे परीक्षा केंद्र होते़ या केंद्रावर २८० कर्मचारी परीक्षेला बसले होते़ या परीक्षेसाठी खेडच्या एकात्मिक बालविकास कार्यालयातील कर्मचाऱ्यांबरोबर सडामिऱ्याचे ग्रामसेवक उद्धव गीते हेही आले होते़ यावेळी गीते यांनी खेडच्या महिला कर्मचाऱ्याची छेड काढल्याने ती संतप्त झाली़ तिने ९़३० वाजण्याच्या सुमारास परीक्षा केंद्राच्या आवारातच गीते यांना चपलेने मारहाण केली़ कानाखाली तसेच पाठीवर जोरदार फटके मारले. याबाबत तक्रार दाखल नव्हती. (वार्ताहर)
महिला कर्मचाऱ्याकडून ग्रामसेवकाची चपलेने धुलाइ
By admin | Updated: December 29, 2014 00:10 IST