शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अकरा सदस्यांसह ग्रामसेवक दोषी

By admin | Updated: April 7, 2015 01:12 IST

टाकवडे ग्रामपंचायत : पंचायत समितीच्या निधीचा दुरुपयोग प्रकरण

कुरुंदवाड : टाकवडे (ता. शिरोळ) येथे पंचायत समितीच्या निधीचा दुरुपयोग केल्याप्रकरणी शिरोळचे गटविकास अधिकारी उदय कुसूरकर यांनी पत्रान्वये ग्रामपंचायतीला दोषी ठरविण्यात आले आहे. रस्त्याच्या कामाच्या ठरावाला मंजुरी देणाऱ्या अकरा सदस्यांसह ग्रामसेवकाला दोषी ठरवल्याने रस्त्याच्या खर्चाची रक्कम दंड म्हणून वसूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावामध्ये खळबळ उडाली आहे. शेतकरी रमजान मियालाल बारगीर यांनी तक्रार केल्याने हे प्रकरण उघडकीस आले.येथील पाटील मळ्याकडे जाणाऱ्या गट नं. १०३३ मधून भाऊसो नुलेपाटील ते सतीश शेवाळे घर असा ५०० मीटरचा रस्ता पंचायत समिती सदस्य मंगला कांबळे यांच्या निधीतून १ लाख रुपये खर्चून रस्त्याचे मुरुमीकरण केले आहे. कोणत्याही रस्त्यावर शासकीय निधी खर्च करताना रस्ता शासनदप्तरी नोंद होणे गरजेचे असते. तसेच नोंद करताना संबंधित सर्व शेतकऱ्यांची लेखी संमती घेणे आवश्यक असते.या रस्त्यावर सुमारे २५ ते ३० शेतकरी आहेत. २९ एप्रिल २०१४ रोजी ग्रामपंचायतीमध्ये रस्त्याचा ठराव करून नोंद करण्यात आली. संमतीपत्रामध्ये थोड्याच शेतकऱ्यांचा समावेश आहे. रस्ता नोंद करून या रस्त्यावर निधी खर्च करण्यासाठी २७ आॅगस्ट २०१४ रोजी ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत ठराव करून रस्ताही पूर्ण केला. संबंधित ठेकेदाराने कामाचे संपूर्ण बिलही उचल केले आहे.रस्ता माझ्या शेतातून असून शासकीय निधी कसा खर्च केला, असा प्रश्न उपस्थित करून रमजान मियालाल बारगीर यांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रार केल्याने चौकशी केली असता ग्रामपंचायतीकडून त्रुटी झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे गटविकास अधिकारी कुसूरकर यांनी रस्त्याची नोंद घेताना दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांची लेखी सहमती घेणे आवश्यक होते, परंतु ती घेतली गेली नाही. रस्त्याची तात्पुरती नोंद घेतली आहे. तात्पुरती नोंद घेण्याची कार्यप्रणाली ग्रामपंचायत अधिकारात नाही. रस्त्याबाबत ग्रामपंचायत टाकवडे यांना जबाबदार धरण्यात येत असल्याचा ठपका ठेवला असल्याचा निर्णय लेखी पत्रातून कळविला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. सरपंच भारती कांबळे यांच्यासह अकरा सदस्य व ग्रामसेवक ए. आर. मुल्ला यांना दोषी ठरविले. निर्णयावर ग्रामपंचायत कोणता निर्णय घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)खर्चाची रक्कम दंड म्हणून वसूलरस्त्याच्या कामासाठी २७ आॅगस्ट २०१४ रोजी ठराव करुन तो मंजूर केला. यावेळी सरपंच भारती सुरेंद्र कांबळे, उपसरपंच - अमोल श्रीपाल चौगुले, सदस्य सर्वश्री शेखर आण्णासो पाटील, अविनाश बाळासो कांबळे, उदय सखाराम झुटाळ, दावल मुबारक शेख, संजयकुमार जिनपाल पडियार, कविता संजय निर्मळ, मेहराजबी अल्लाउद्दीन मुल्ला, लता सतगोंडा पाटील, अनिता चंद्रकांत कोळी, ग्रामसेवक ए. आर. मुल्ला उपस्थित होते. त्यांच्याकडून रस्त्याच्या खर्चाची रक्कम दंडात्मक स्वरुपात वसूल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.