शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

राधानगरी तालुक्यात ग्रामपंचायतींचे धुमशान--राजकीय मोर्चेबांधणी जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 23:54 IST

राधानगरी : राधानगरी तालुक्यात ६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीची राजकीय मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे.

ठळक मुद्देथेट सरपंच निवडणुकीमुळे समीकरणे बदलणारउमेदवारांना अर्ज दाखल करण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे अगोदर आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.

संजय पारकर । -लोकमत न्यूज नेटवर्कराधानगरी : राधानगरी तालुक्यात ६६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीची राजकीय मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे. सरपंचपदासाठी प्रथमच थेट निवडणूक होणार असल्याने मोठी उत्सुकता असून बरीच समीकरणे बदलणार आहेत. निवडणूक आयोगाकडून यावेळी निवडणूक पद्धतीत मोठ्या प्रमाणात फेरबदल केले आहेत. त्याला सामोरे जाताना इच्छुकांची तारांबळ उडणार आहे. निवडणुकीच्या सर्व प्रक्रिया होणार असल्याने यातच उमेदवारांची अर्धी शक्ती खर्च होणार आहे.

तहसीलदार शिल्पा ओसवाल यांनी याबाबतची माहिती देण्यासाठी नुकतीच कार्यकर्ते व ई-सेवा देणाºया केंद्र चालकांची कार्यशाळा घेतली. यावेळी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीची पारंपरिक पद्धत पूर्णपणे बदलल्याचे स्पष्ट झाले. उमेदवारांना अर्ज दाखल करण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडे अगोदर आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. त्यात मालमत्ता विवरणपत्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे व अपत्याबाबतचे प्रतिज्ञापत्र भरावे लागणार आहे. या अर्जाची छापील प्रत काढून त्यावर आवश्यक तेथे सह्या, सोबत ग्रामपंचायतीची बाकी नसल्याचे, ठेकेदार नसल्याचे व शौचालय असल्याचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे.

निवडणुकीसाठी मर्यादा घालून दिलेला खर्च बँकेतूनच करावा लागणार असल्याने राष्ट्रीयीकृत किंवा जिल्हा बँकेत नव्याने सुरु केलेल्या बचत खात्याच्या पासबुकाची प्रत जोडावी लागणार आहे. सोबत २१ वर्षे पूर्ण असलेला वयाचा पुरावा, अनामत रकमेची पावती, सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार असल्याने १ जानेवारी १९९५ नंतर जन्मलेल्या व्यक्तीने किमान सातवी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा जोडावा लागणार आहे. राखीव जागेवर निवडणूक लढविणाºयांनी जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. ते नसल्यास जिल्हा पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल केल्याची पोहोच व ते सहा महिन्यात दाखल करण्याचे हमीपत्र द्यावे लागणार आहे.

आँनलाईन अर्ज ई-सेवा केंद्रात २४ तास केव्हाही भरता येईल मात्र त्याची प्रत व वरील सर्व कागदपत्रे मुदतीत दुपारी साडेचार पर्यंत निवडणूक अधिकाºयाकडे जमा करावी लागणार आहेत.खर्चाचा तपशील दररोज द्यावा लागणारमागीलवेळी जात वैधता प्रस्ताव तहसील कार्यालयात स्वीकारून पोहोच दिली होती. मात्र आता फक्त अर्ज भरणार असल्याचे शिफारसपत्र दिले जाईल. उमेदवारांना परस्पर जिल्हा जात पडताळणी समितीकडे प्रस्ताव दाखल करून पोहोच घेण्यासाठी या कार्यालयात जावे लागणार आहे. मागील वेळी शेवटच्या दोन दिवसांत आँनलाईन अर्ज दाखल करण्यात अडचणी आल्याने हस्तलिखित अर्ज घेतले होते. यावेळी मात्र असे होणार नाही. होणाºया खर्चाचा तपशील रोजच्या रोज द्यावा लागणार आहे.