शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

ग्रामपंचायतींचा आखाडा रंगणार

By admin | Updated: March 20, 2017 00:52 IST

आॅक्टोबरपासून होणार निवडणुका ४७९ गावे; राजकीय पक्ष आतापासूनच तयारीला

कोल्हापूर : नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या रणधुमाळीनंतर आता आॅक्टोबरपासून ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी उडणार आहे. यात जिल्ह्यातील तब्बल ४७९ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. आतापर्यंत गटातटात कमालीच्या चुरशीने होणाऱ्या या निवडणुकांमध्ये यावेळी थेट पक्षाचा सहभाग असणार आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर आपली सत्ता आणण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी आतापासूनच चाचपणी सुरू केली असून, भाजपने रविवारी याबाबत आढावा बैठकही घेतली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणीच दिसणाऱ्या भाजपचे नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष झाले; तर जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुकांतही भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गावपातळीवर सत्ता ताब्यात राहावी, यासाठीही निवडणुका जाहीर होण्याआधीच सहा महिने भाजपने तयारी सुरू ठेवली आहे. ग्रामपंचायतीला थेट निधी देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना तेथील सत्ता महत्त्वाची असल्याचे ओळखले आहे. याआधीही पक्षाला याची जाणीव होती; परंतु त्यासाठी सत्तेचे जे पाठबळ लागते ते नव्हते. शिवसेना भाजपपेक्षाही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुजल्याने अनेक ठिकाणी शिवसेनेचे सरपंच, उपसरपंच, सदस्य दिसून येतात. ही उणीव भरून काढण्यासाठी आता भाजपने कंबर कसली आहे. भाजपचे संघटनमंत्री बाबा देसाई यांनी रविवारी बारा तालुकाध्यक्षांची बैठक घेतली. यामध्ये जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील किती ग्रामपंचायतींची निवडणूक आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत होणार आहे, याची त्यांना माहिती देण्यात आली. तेथील सध्याची राजकीय स्थिती, बलाबल, संभाव्य शक्यता यांची माहिती घेऊन पुन्हा पुढील आठवड्यात या तालुकाध्यक्षांना पाचारण करण्यात आले आहे. त्यांच्याकडून पंचायत समिती, जिल्हा परिषदेसाठी गाववार कसे मतदान झाले याची आकडेवारीही यावेळी संकलित करण्यात आली. ही माहिती घेऊन प्रत्येक तालुकानिहाय तेथील पदाधिकाऱ्यांसह बैठक घेऊन, मित्रपक्षांशी चर्चा करून अधिकाधिक ग्रामपंचायती लढविण्याचे नियोजन भाजपने केले आहे. डिसेंबर २०१७ अखेर निवडणूक लागणाऱ्या ग्रामपंचायतीतालुकाग्रा. पंचायत सदस्य संख्यासंख्याकागल२६२४०हातकणंगले४१५४९चंदगड४१३२१भुदरगड४४३२८शिरोळ१७१९३करवीर५३५८७गगनबावडा२११५५राधानगरी६६५६६गडहिंग्लज३४३००आजरा३७३०९पन्हाळा५०४२६शाहूवाडी४९४०३एकूण४७९४४०७महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांमध्ये भाजपचे सभापती होत आहेत. त्यामुळे गावागावांत पक्ष रुजविण्याची हीच संधी आहे. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी निवडणुका लढविणे, जिंकणे आणि सत्तेच्या माध्यमातून ग्रामविकासाच्या कल्पना राबविणे यासाठी भाजपची तयारी चालू आहे. - बाबा देसाई, संघटनमंत्री, भाजप